मुंबई: महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त आणि आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या वित्तीय संस्थांनी दिलेल्या कृषी कर्जाच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कर्जांचे पुनर्गठन (Restructuring) करण्याचेही सरकारने ठरवले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश काढण्यात आला आहे.
मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपये, डोळे किंवा अवयव निकामी झाल्यास 40 ते 60 टक्के अपंगत्वासाठी 74 हजार रुपये तर 60 टक्केपेक्षा अधिक अपंगत्वासाठी 2.50 लाख रुपये, एक आठवड्यापेक्षा जास्त रुग्णालयात उपचार घेतल्यास 16 हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षा कमी असल्यास 5 हजार 400 रुपये मदत देण्यात येणार आहेत.
घरांच्या नुकसानीसाठी मदत
पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी सपाट भागात 1.20 लाख रुपये तर डोंगराळ भागात 1.30 लाख रुपये. अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांसाठी 6 हजार 500 रुपये आणि कच्च्या घरांसाठी 4 हजार रुपये. झोपडीसाठी 8 हजार रुपये आणि गोठ्यासाठी 3 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
हेही वाचा: Vasai Virar Election: वसई-विरार महापालिका निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे?, नेमकं कारण काय?
जनावरांसाठी
दुधाळ जनावरासाठी 37,500 रु
ओढकाम जनावरासाठी 32,000 रु
लहान जनावरासाठी 20,000 रु
शेळी/मेंढीप्रमाणे 4,000 रु
प्रत्येक कोंबडीसाठी 100 रुपये मदत.
शेती पिकांचे नुकसान
जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टर 8,500 रु
बागायत पिकांसाठी प्रतिहेक्टर 17,000 रु
बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टर 22,500 रु
शेतजमीन नुकसान भरपाई
गाळ काढण्यासाठी प्रतिहेक्टर 18,000 रु
दरड कोसळणे, जमीन खचणे किंवा वाहून जाणे अशा स्थितीत अल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 47,000 रु मदत दिली जाईल.
इतर सवलती आणि सुविधा
जमीन महसुलात सूट
सहकारी कर्जांचे पुनर्गठन
शेतीशी संबंधित सर्व प्रकारच्या कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती
तिमाही वीज बिलात माफी
विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात सूट
मदत वितरण सुरू
पहिला टप्पा निधी आधीच वितरित करण्यात आला असून दुसरा टप्पा तात्काळ दिला जाणार आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.