Sunday, July 13, 2025 10:12:49 AM

60 वर्षीय वयोवृद्ध आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून नातू फरार

त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्याच नातवाने आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

60 वर्षीय वयोवृद्ध आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून नातू फरार

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात माणुसकीला काळी फासणारी घटना समोर आली आहे. त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्याच नातवाने आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

हेही वाचा: सिंदखेडराजामधील अनेक ऐतिहासिक मूर्ती कचऱ्यात; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदा गायकवाड (वय: 60) या मालाड परिसरात आपल्या नातव्यासोबत राहत होत्या. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आणि त्वचेचा कॅन्सर झाल्याने त्यांची देखभाल करणे टाळत, नातवाने त्यांना कचऱ्यात फेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रकार समोर येताच घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत वृद्ध महिलेला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. तसेच, या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित नातवाचा आणि इतर कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.

ज्या व्यक्तींनी आपल्याला लहानपणी मोठं केलं, प्रेम दिलं, त्यांच्याच वृद्ध अवस्थेत अशी अमानुष वागणूक होणे ही समाजासाठी लज्जास्पद बाब आहे. सध्या विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात यशोदा गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे समाजातील मानवतेच्या मूल्यांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 'वृद्धांची जबाबदारी टाळणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवला जाईल', अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.


सम्बन्धित सामग्री