Friday, March 13, 2026 07:32:50 AM

Harshwardhan Sapkal : भाजपसोबतच्या युतीवर सपकाळांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, "भाजप आणि शिंदेसेना यांचा पाठिंबा..."

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

harshwardhan sapkal  भाजपसोबतच्या युतीवर सपकाळांनी केला मोठा खुलासा म्हणाले quotभाजप आणि शिंदेसेना यांचा पाठिंबाquot

दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सकाळी दादरच्या शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

हेही वाचा- Supriya Sule : अजितदादांच्या मृत्यूवर रोहित पवारांचे खळबळजनक दावे; सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली मोठी मागणी
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "जो पर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत निवडणूक लावली जात नाही... भिवंडीत ही असंच पाहायला मिळाल... भिवंडीत आम्ही निवडणुकाना सामोर गेलो... सर्वाधिक कांग्रेसला नगरसेवक दिले... 16 जागा आम्हाला कमी पडल्या, तिथे आम्ही सेक्युलर फ्रेंट सुरु केली... त्यात शरद पवार यांचे 12 नगरसेवक आले आणि 42 संख्या झाली... अपक्ष मोट बांधण्याचा प्रयत्न केला मात्र कोंडी फुटत नव्हती... आमच्या पक्षाचा ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता..." 

हेही वाचा- Chhagan Bhujbal : "उड्डाण घेणार तितक्यात..." राज्यातील नेत्यांच्या मागे लागलंय शुक्लकाष्ठ? मुंडेनंतर भुजबळांसोबतही घडला तो भीतीदायक प्रसंग
पुढे भिवंडीमध्ये भाजपसोबतच्या युतीवरून हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "आम्ही भाजप आणि शिंदे सेना यांचा पाठिंबा घेणार नाही ही आमची भुमिका होती... भाजप सोडून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा कराया तयार आहोत... यात कोणाचा अर्ज ठेवायचा यावर आम्ही निर्णय घेऊ... नारायण चौधरी यांनी अर्ज भरला  आहे तर आमच्याकडून तारक अन्वर यांनी अर्ज भरला आहे... नारायण चौधरी यांनी भाजप सोडलेली आहे... गोबेलची थेरी ही हिटलरने कमी आणि भाजपने जास्त वापरली..."


सम्बन्धित सामग्री