Mumbai Weather Forecast: सध्या राज्यात नैऋत्य मान्सून बरसत आहे. सध्या राज्यातील मुंबई, पुणेसह अनेक शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अरबी समुद्र आणि खंभातच्या आखातातून दमट वारे वाहत आहेत, ज्यामुळे पावसासाठी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी पुढील 5 दिवसांसाठी हवामान अपडेट जारी केले आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस आणि भरती-ओहोटीचा इशारा -
भारतीय हवामान अंदाजानुसार, 25 ते 30 जून दरम्यान मुंबईत हवामान खराब राहील. तथापी, 24 जून ते 28 जून दरम्यान भरती-ओहोटी येण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11:15 वाजता अरबी समुद्रात 4.59 मीटर उंच लाटा उसळल्या. हवामान विभागाने जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांत 19 दिवस उंच लाटांचा इशारा जारी केला आहे. तथापी, BMC ने पर्यटकांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईतील जुहूसह इतर समुद्रकिनाऱ्यांवर दक्षता वाढवली आहे. तसेच बीएमसीने आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करून सूचना जारी केल्या आहेत.
हेही वाचा - नैऋत्य मान्सूनचा जोर वाढणार! कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटावरील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सून पुढील 2 दिवसांत उत्तर अरबी समुद्राच्या काही भागात, राजस्थान, पंजाबचा काही भाग, हरियाणा-चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागात, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशच्या उर्वरित भागात आणि जम्मूच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. परिणामी 25 जूनपासून वायव्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - मुंबईतील काही भागात कमी दाबाने होणार पाणीपुरवठा; जाणून घ्या सविस्तर माहिती
तथापी, पुढील 7 दिवसांत मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज शहरात ढगाळ आकाश राहून जोरदार पाऊस पडेल. तापमान किमान 26 अंश सेल्सिअस ते कमाल 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.