Tuesday, November 18, 2025 04:13:03 AM

Shiv Sena Nirdhar Mela: एका खोलीत 38 मतदार कसे राहू शकतात? आदित्य ठाकरेंचा निर्धार मेळाव्यात निवडणूक आयोगाला सवाल

आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'आमच्या पाहणीत असे 214 पत्ते सापडले आहेत, जिथे एकूण 3335 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे, पण हे लोक प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहतच नाहीत.'

shiv sena nirdhar mela एका खोलीत 38 मतदार कसे राहू शकतात आदित्य ठाकरेंचा निर्धार मेळाव्यात निवडणूक आयोगाला सवाल

Shiv Sena Nirdhar Mela: मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आज वरळीतील डोम येथे ‘निर्धार मेळावा’ आयोजित केला. या मेळाव्यात पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील अनियमिततेबाबत गंभीर आरोप करत निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात सादर केलेल्या व्हिडिओमध्ये एका लहानशा खोलीचा पत्ता दाखवण्यात आला होता, जिथे निवडणूक आयोगाच्या यादीत तब्बल 38 मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचे त्यांनी दाखवले. एका खोलीत प्रत्यक्षात जास्तीत जास्त पाच लोक राहू शकतात. मग या 38 जणांची नोंदणी कशी झाली? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 'आमच्या पाहणीत असे 214 पत्ते सापडले आहेत, जिथे एकूण 3335 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे, पण हे लोक प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहतच नाहीत.' तथापी, आदित्य ठाकरे यांनी मतदार यादी अधिकारी यांच्यावर जबाबदारी पार पाडण्यात झालेल्या त्रुटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा - Nagpur NCP Office Lavani Dance: नागपूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांकडून जोरदार टीका

मेळाव्यादरम्यान आदित्य ठाकरे यांच्या सादरीकरणानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, 'आदित्यने दाखवलेली ही उदाहरणे म्हणजे मतदार याद्यांतील मोठ्या गैरप्रकारांची सुरुवात आहे. याची चौकशी संपूर्ण राज्यभर व्हायला हवी, पण या लढ्याची सुरुवात आम्ही मुंबईपासून करू.'

हेही वाचा - Sarangi Mahajan on Pankaja Munde: 'ती गुंडगिरीकडे वळली आहे...'; सारंगी महाजन यांची पंकजा मुंडे यांच्यावर खोचक टीका

तथापी, मुंबईवर दोन प्रभावशाली व्यापाऱ्यांची नजर असल्याचा दावा करत उद्धव ठाकरे म्हणाले, 'मुंबईवर कोणाचा डोळा आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. तुमच्या मनातली नावे मला माहीत आहेत, पण ती मी माईकमध्ये घेणार नाही. मात्र मुंबई विकू देणार नाही, हा आमचा निर्धार आहे.' या मेळाव्यात शिवसेनेने मतदार यादीतील ‘मतचोरी’ आणि ‘घोळ’ हे निवडणुकीतील मुख्य मुद्दे बनवण्याचे संकेत दिले असून, पक्षाने राज्यभर या मोहिमेचा विस्तार करण्याचा इशाराही दिला आहे. 


सम्बन्धित सामग्री