Thursday, February 12, 2026 05:53:27 PM

Ajit Pawar Pune Speech: 'मी मोठ्या काकाचा पुतण्या, तुझ्या बापापेक्षा माझा काका...'; अजित पवारांची पुण्यातील भाजप उमेदवारावर खोचक टीका

प्रभाग 4 मधील भाजपचे उमेदवार सुरेंद्र पठारे यांच्यावर टीका करताना अजित पवारांनी कौटुंबिक राजकारणाच्या 'बनवाबनवी'वरून सडकून टीका केली.

ajit pawar pune speech मी मोठ्या काकाचा पुतण्या तुझ्या बापापेक्षा माझा काका अजित पवारांची पुण्यातील भाजप उमेदवारावर खोचक टीका

Ajit Pawar Pune Speech: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास 'दादा' शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. प्रभाग 4 मधील भाजपचे उमेदवार सुरेंद्र पठारे यांच्यावर टीका करताना अजित पवारांनी कौटुंबिक राजकारणाच्या 'बनवाबनवी'वरून सडकून टीका केली. "तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा आहे," अशा शब्दांत त्यांनी पठारेंना सुनावले.

'ही काय बनवाबनवी सुरू आहे?'

चंदननगर येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी पठारे कुटुंबातील राजकीय विसंगतीवर निशाणा साधला. ते म्हणाले, "वडिल तुतारीचे आमदार आणि मुलगा-सून भाजपचे उमेदवार? ही काय बनवाबनवी आहे? मतदारांना काय तुम्ही दुधखुळे समजता का?" विकास करण्याच्या भाजपच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "इतके दिवस काय केलं?" असा सवालही त्यांनी विचारला. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि टँकर लॉबीवर अजित पवारांनी थेट प्रहार केला. ते म्हणाले, या भागातील टँकर माफियांचं कंबरडं मोडलं नाही, तर नावाचा अजित पवार सांगणार नाही. मला कळलंय की इथले काही उमेदवारच टँकर माफिया आहेत. पुण्यात सुरू असलेला ड्रग्जचा व्यापार थांबवण्यासाठी एकदा 'घड्याळा'चं बटण दाबून बघा, मग बघा मी काय करतो, अशी साद त्यांनी मतदारांना घातली. जर कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला, तर आम्ही कच्चे नाही. कार्यकर्त्यांच्या वाटेला जाल, तर सोडणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

हेही वाचा - Bala Nandgaonkar Letter: "मी साहेबांना दिलेला 'तो' शब्द पाळला... आता मुंबई वाचवा", बाळा नांदगावकरांचे मुंबईकरांना पत्रातून भावनिक आवाहन

'होय, आम्ही महायुतीत आहोत, पण...'

राज्यात आणि केंद्रात भाजपसोबत असूनही पुण्यात भाजप नेत्यांना लक्ष्य करताना अजित पवार म्हणाले, "आम्ही शरीफ आहोत म्हणून तुमच्यासोबत आहोत, पण तुम्ही इथे जी माणसं ठेवली आहेत ती चुकीची आहेत." मेट्रो आणि PMPML मोफत करण्याच्या आपल्या घोषणेवर ठाम राहत त्यांनी विरोधकांना विचारले, "मला अर्थसंकल्प मांडण्याची अक्कल आहे, मी काहीही विचार केल्याशिवाय बोलत नाही."

हेही वाचा - Amit Thackeray: मतदान केंद्रावरच 'खळ्ळ-खटॅक'; "दुबार मतदार दिसला की डायरेक्ट..." अमित ठाकरेंचा कार्यकर्त्यांना थेट मनसे स्टाईल आदेश

'मागे झालं ते गंगेला मिळालं'

प्रभाग 4 आणि 5 मध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) विजयासाठी त्यांनी माऊली कटके आणि अशोक पवार या दोन माजी विरोधकांना एकत्र आणले आहे. "मागे जे झालं ते गंगेला मिळालं, आता फक्त विजयाचा विचार करा," असे सांगत त्यांनी जुने हेवेदावे विसरून कामाला लागण्याचे आदेश दिले.


सम्बन्धित सामग्री