Wednesday, June 18, 2025 03:26:39 PM

अजून लिहिलं असतं तर हाहा:कार माजला असता; पुस्तकामधील दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावरुन वाद निर्माण झाला आहे.

अजून लिहिलं असतं तर हाहाकार माजला असता पुस्तकामधील दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावरुन वाद निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यानंतर अजून लिहिलं असतं तर हाहा:कार माजला असता अशी प्रतिक्रिया राऊतांनी केली आहे.  

'अजून लिहिलं असतं तर हाहा:कार माजला असता'
बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी, शाहांना मदत केली. पवारांमुळे मोदींची अटक टळली असा खळबळजनक खुलासा राऊत यांनी केला आहे. यानंतर सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. यावर अजून लिहिलं असतं तर हाहा:कार माजला असता. काही गोष्टी गोपनीय असाव्यात, मी केवळ संदर्भ दिले अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. 

हेही वाचा : Sanjay Raut Book Controversy: संजय राऊतांच्या पुस्तकावर विरोधकांची बोचरी टीका

पुस्तकामधील दाव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अजूनही खूप काही लिहू शकलो असतो. मात्र मी रामाचा भक्त असल्यानं मर्यादा पाळल्या असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. मोदींनी बाळासाहेबांकडे वारंवार मदतीची मागणी केली. तेव्हा अमित शाहांना फारसं कुणी ओळखतही नव्हतं. ही व्यक्ती कोण? असा सवाल बाळासाहेबांनी मोदींना केला होता. तेव्हा ही व्यक्ती माझी खास, खूप कामाची आहे, असं मोदींनी म्हटलं होतं. भाजपानं बाळासाहेबांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला हल्लाबोल राऊतांनी केला आहे. तसेच 35 मिनिटांच्या फोनवरील संभाषणाची क्लीप टाकली नाही असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. 

नरकातला स्वर्ग पुस्तकातील खळबळजनक दावे
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं. मोदी विरुद्ध केंद्र असा संघर्ष सुरु होता. गोध्राकांडात सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे होता. अनेक पोलीस अधिकारी, अमित शाहांना तुरुंगात जावं लागलं होतं. असा दावा राऊतांनी पुस्तकातून केला आहे. चौकशीची बंदूक मुख्यमंत्री मोदींपर्यंत येऊन पोहोचली होती. मोदींना अटक होईल असं वातावरण निर्माण झालं होतं. लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं. पवारांच्या भूमिकेला अनेकांची मूकसंमती मिळाली आणि मोदींची अटक टळली असा गौप्यस्फोट खासदार राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' पुस्तकातून केला आहे. 

 


सम्बन्धित सामग्री