मालेगाव : तुम्ही आकाश पाळण्यात बसत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पाळण्यात बसणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. होडी पाळण्यातून खाली पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे.
24 वर्षीय मोहम्मद उबेद हा तरुण मित्रासोबत यात्रेत गेल्यानंतर होडीसारख्या आकाश पाळण्यात बसला. या पाळण्याला सेफ्टी बेल्ट नव्हते. झोका वर गेल्यानंतर उबेदचा हात सटकला आणि तो सुमारे 50 फूट उंचीवरून जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आकाश पाळण्याच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह लागला आहे.
हेही वाचा : राज्य सरकारकडून आंबेडकर जयंतीनिमित्त टूर सर्कीट सहलीचे आयोजन; कोणत्या शहरात जाणार सहल?
पाळण्यात बसण्याचा मोह जीवावर बेतला
यात्रेमध्ये पाळण्यात बसण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. होडी पाळण्यातून खाली पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. मालेगाव शहरात खळबळजनक घटना घडली आहे. यात्रेतील आकाश पाळण्यात बसण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला असून होडी सारख्या असलेल्या पाळण्यातून हा तरुण पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरात घडली असून घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
ईद आणि विविध यात्रेनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही मालेगावच्या हिरापूर भागात मेळा भरला असून त्यात आकाश पाळणा, होडी पाळणा यांसह इतर पाळणे आणि दुकानी आहेत. यात्रेत मोठी गर्दी होतं असून 24 वर्षीय मोहम्मद उबेद हा तरुण मित्रासोबत मेळ्यात गेल्यानंतर होडीसारख्या पाळण्यात बसण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. तो होडीसारख्या पाळण्यात जाऊन बसला. या पाळण्याला सेफ्टी बेल्ट नव्हते. झोका वर गेल्यानंतर उबेदचा हात सटकला आणि तो सुमारे 50 फूट उंचीवर जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आकाश पाळण्याच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह लागला आहे.