Thursday, July 17, 2025 02:53:02 AM

देवळा तालुक्यात लपूनछपून गांजाची शेती

देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात राजेंद्र देवरे याने चोरून गांजाची शेती केली होती. पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या पथकाने कारवाई करत 11 किलो गांजा जप्त केला.

देवळा तालुक्यात लपूनछपून गांजाची शेती

देवळा: देवळा तालुक्यातील सांगवी उमराणे शिवारात चोरट्या पद्धतीने गांजाची शेती करणाऱ्या इसमावर देवळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांनी धडक कारवाई केली आहे.

पोलिस निरीक्षक नेहते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सांगवी उमराणे शिवारातील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सार्थक नेहते आणि त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत राजेंद्र विठ्ठल देवरे याच्या शेतात धाड टाकली.

हेही वाचा:शरद पवार गटाने मुख्यंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

शेतात सहा फूट उंचीची सहा गांजाची झाडे आढळून आली. ही झाडे जप्त करण्यात आली असून त्याचे एकूण वजन 11 किलो 122 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 1,11,220 रुपये इतकी आहे. संबंधित गांजा हिरव्या आणि ओल्या अवस्थेत जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'हिंदी नकोच', मनसेकडून शाळांना निवेदन; धुळ्यात राज ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी

या प्रकरणी आरोपी राजेंद्र विठ्ठल देवरे (रा. उमराणे शिवार) यास ताब्यात घेण्यात आले असून देवळा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री