छत्रपती संभाजीनगर: इम्तियाज जलील विरुद्ध संजय शिरसाट वाद शिगेला पेटला आहे. कुणी चिखलफेक केली तर त्याला जशास तसं उत्तर मिळेल. मी कुणाला घाबरत नाही असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. जलील यांनी शिरसाटांवर आरोप केले आहेत. त्यामुळे शिरसाट समर्थक आक्रमक झाले आहेत. जलील यांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा शिरसाट समर्थकांनी दिला आहे. यामुळेच इम्तियाज जलील यांच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले. यानंतर शिरसाट समर्थक माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे. मी कुणाला घाबरत नाही, मी चर्चा करायला तयार आहे, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यावर आरोप केले. या आरोपानंतर संजय शिरसाट समर्थक संघटना माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर शेणफेक करणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घराला बंदोबस्त लावला आहे.
हेही वाचा : Navi Mumbai: ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात सिलेंडरचा स्फोट
काय म्हणाले माजी खासदार इम्तियाज जलील?
माझ्या माहितीप्रमाणे ते कोणतेही कार्यकर्ते नाही, गरीबी खुप वाढलेली आहे. किरायाचे तट्टू त्यांना बोलवावे लागत आहेत, मी कोणाला घाबरत नाही, माझ्यासोबत चर्चा करायला येत असतील तर मी चर्चा करायला तयार आहे. कोणी चिखलफेक केली तर जशाला तसं उत्तर दिलं जाईल असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, जलील यांनी केलेल्या आरोपांवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. जाऊद्या त्याबद्दल काही बोलायचे नाही. त्यांना जे करायचे ते करुदे. असे दलाल मार्किटमध्ये भरपूर असल्याची टीका मंत्री शिरसाट यांनी केली आहे.