Wednesday, February 18, 2026 05:45:19 PM

MNS Winner Candidate List: मुंबईत मनसेच्या महिला शिलेदारांचा करिश्मा; 'या' 6 रणरागिणींनी राखली 'इंजिन'ची प्रतिष्ठा

मुंबईत एकूण 52 उमेदवार रिंगणात उतरवणाऱ्या मनसेला ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मोठ्या यशाची अपेक्षा होती, मात्र मतदारांनी केवळ 6 जागांवर मनसेच्या उमेदवारांना कौल दिला आहे.

mns winner candidate list मुंबईत मनसेच्या महिला शिलेदारांचा करिश्मा या 6 रणरागिणींनी राखली इंजिनची प्रतिष्ठा

MNS Winner Candidate List: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनची गती अपेक्षेपेक्षा कमी राहिली असली, तरी राज ठाकरे यांच्या 6 महिला उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत पक्षाचे अस्तित्व सिद्ध केले आहे. मुंबईत एकूण 52 उमेदवार रिंगणात उतरवणाऱ्या मनसेला ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मोठ्या यशाची अपेक्षा होती, मात्र मतदारांनी केवळ 6 जागांवर मनसेच्या उमेदवारांना कौल दिला आहे.

मुंबईत महिला शक्तीचा विजय

मनसेच्या या विजयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निवडून आलेले सर्व 6 उमेदवार महिला आहेत. प्रस्थापित पक्षांच्या दिग्गज नेत्यांना धूळ चारत या महिलांनी मुंबईच्या विविध प्रभागांत 'इंजिन'ला गती दिली आहे. 

हेही वाचा - BJP Wins NMMC : नवी मुंबईत गणेश नाईकांचे वर्चस्व कायम; भाजपची एकहाती सत्ता, तर शिंदेंच्या सेनेचा टांगा पलटी

मनसेच्या विजयी रणरागिणींची यादी:

प्रभाग क्रमांक 38: सुरेखा परब (विजयी)
प्रभाग क्रमांक 74: विद्या आर्या (विजयी)
प्रभाग क्रमांक 110: हरीनाक्षी मोहन चिराथ (विजयी)
प्रभाग क्रमांक 115: ज्योती राजभोज (विजयी)
प्रभाग क्रमांक 128: सई शिर्के (विजयी)
प्रभाग क्रमांक 205: सुप्रिया दळवी (विजयी)

हेही वाचा - BMC Election Results 2026 : मुंबई महापालिकेची आताची आकडेवारी काय?; पहा अजून किती जागांचे अंतिम निकाल येणं बाकी, पक्षनिहाय आकडेवारी समोर

दरम्यान, शिवसेना (UBT), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या युतीचा फायदा काही मोजक्या जागांवर झाला असला, तरी मुंबईत भाजप-शिंदे युतीला रोखण्यात ही आघाडी अपयशी ठरल्याचे दिसत आहे. मनसेने दक्षिण मुंबईच्या तुलनेत उपनगरांमध्ये चांगली लढत दिली. सुरेखा परब आणि सई शिर्के यांनी मतदारांशी साधलेला थेट संवाद विजयासाठी निर्णायक ठरला. मनसेचे इंजिन किमान 15 ते 20 जागांपर्यंत मजल मारेल असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात आकडा सिंगल डिजिटमध्ये राहिल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी शांतता आहे. तथापी, मुंबई महापालिकेत मनसे उमेदवारांचा आकडा जरी कमी असला, तरी या निवडून आलेल्या 6 महिला नगरसेविका सभागृहात राज ठाकरे यांचा आवाज बुलंद करतील. या महिला उमेदवारांच्या विजयामुळे मनसेमध्ये महिला आघाडीची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.


सम्बन्धित सामग्री