सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पित्यानेच आपल्या मुलाला आत्महत्येच कारण देत टोकाचं पाऊल उचललं आहे. 47 वर्षीय अनिल मारुती नरवडे यांनी सोलापुरातील संभाजी महाराज तलाव परिसरातील रेल्वे पुलावरून उडी घेत जीवन संपवलं आहे. दारू, जुगार याच्या आहारी गेल्यामुळे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे. अनिल नरवडे यांना स्वतःच्या कर्जापायी स्वतःची तीस हजार रुपयांची दुचाकी गहाण ठेवावी लागली होती, याच विवेंचनातून आणि स्वतःच्या कृतीच्या पश्चातापातून टोकाचे पाऊल उचलले. धक्कादायक बाब म्हणजे, 'मी तुझ्या लायकीचा वडील राहिलो नाही, मला माफ कर. वाईट मार्गाला लागल्यामुळे मी कधी सुधारलो नसतो. कृष्णा, मी माझे सर्व ओझे तुझ्यावर सोडून जात आहे. तू आई आणि भावाचा सांभाळ कर. माझा मार्ग कधीच धरू नकोस. कारण तो कधीच चांगला ठरला नाही' असा संदेश व्हाट्सअपद्वारे मुलाच्या मोबाईलवर पाठवून 47 वर्षाच्या बापाने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि मृत्यूला कवटाळलं. याप्रकरणी सोलापुरातील सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा- Crime News: तीन वेळा आईस्क्रीम खाल्लं, मग अचानक झाला वाद; रागाच्या भरात तरुणावर भीषण हल्ला, अन् मग मृतदेहाचे तुकडे चुलीत टाकून...
त्यांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहले होते की, "अनु मी जे पण बोलत आहे ते माझ्या मजबुरीत बोलत आहे. त्यामुळे तु रागाला येऊ नकोस कारण की मुळात वाईट असल्यामुळे हे सर्व घडत आहे. कारण की मी जुगारी असल्यामुळे हे आज वर घडत गेले आहे आपली गाडी मी कुट घानंवट ठेवली आहे ते तुला सांगत बसलो तर तुझ्या लक्षात येणार नाही. म्हणून, राहुल कोळी याला सोबत घेऊन जा त्याला माहित आहे की मी जुगार कुठे खेळत होते ते तिथे मी आज 30000 हजार गाडी धानंवट ठेवली आहे. तेथून सोडवणे तुझ काम आहे कारण की हे सर्व तुला माहित आहे. कृष्णा मी तुझ्यावर माझे ओझे सर्व सोडुन जात आहे कारण, की मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही कारण की बाईट मार्गाला लागलो असल्यामुळे मी कधीच सुधरु शकलो नाही. कमीत कमी तुम्ही माझा मार्ग कधीच धरु नये कारण की माझा मार्ग आजपर्यंत कधीच लांगला ठरला नाही. त्यामुळे मी आता शेवटचा मार्ग घेत आहे तु फक्त भैष्या आणि आई व तुझी मम्मी यांनचा संभाळ कर कारण की माझी अपेक्षा फक्त तुझ्या कडुन आहे. मला खात्री आहे की माझ्या शब्दाचे तु पालन करशील मला माफ कर की मी तुमच्या लायकीचा वडील उखु शकलो नाही. पण तु माझी शेवटची इच्छा आहे समज आणि तु आई भैय्या आणि तुझी मम्मी म्हणजे माझ्या आनुचा सांभाळ कर मी शेवटचं तुझ्याकडून काही तरी मागात आहे. मला खात्री आहे माझा भैच्या आणि तु माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार मी तुमच्या विश्वास सावर सोडुन माझा निरोप घेत आहे. कारण मी तुमचा वडील किंव्हा पप्पा म्हणून घेण्याच्या लायकीचा राहिलो नाही."