मुंबई: मुंबईमधून अत्यं धक्कादायक बातमी समोर आली आहे. वरळीतील सिद्धार्थ नगर येथे एका 60 वर्षीय वृद्धाने आपल्या पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर इमारतीच्या पायऱ्यांवर स्वतःवर गोळी झाडून स्वतःचे जीवन संपवले. घरगुती वादातून ही दुःखद घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मृत जोडपे नामपेली कुटुंबातील होते. वाद आणि त्यानंतर गोळीबाराचे आवाज ऐकल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
हेही वाचा - नवरदेवाच्या करवलीची दिशाभूल करुन 20 ते 25 तोळे पळविले
दरम्यान, वरळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनेत वापरलेले बंदुक जप्त केले आहे. आरोपीने बंदूक कशी मिळवली, या तपास सध्या पोलिस करत आहेत. या जोडप्याच्या मृत्यूमुळे स्थानिक लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. तथापि, पोलिस घटनेच्या सभोवतालच्या परिस्थितीचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - Gondia Crime: मद्यधुंद अवस्थेत इसमाला मारहाण केल्याने पोलीस निलंबित
नवी मुंबईत बेघर व्यक्तीची हत्या -
नवी मुंबईत दुसऱ्या एका घटनेत रविवारी पहाटे एका बेघर व्यक्तीची हत्या करण्यात आली. पीडित व्यक्तीचे नाव प्रकाश नागोराव लोखंडे असे असून तो शाहबाज बेलापूर पुलाखालील रस्त्यावर झोपला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, पीडित व्यक्तीचा आरोपी अभिषेक सिंग उर्फ अभिषेक पाल याच्यासोबत वाद झाल्यानंतर पहाटे 3:45 च्या सुमारास प्रकाश लोखंडेवर हल्ला करण्यात आला. आरोपी अभिषेक सिंग उर्फ अभिषेक पाल याने झोपलेल्या व्यक्तीवर मोठ्या दगडाने हल्ला केला. यात बेघर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.