Taj Hotel: ताज हॉटेल हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक मानले जाते. तथापि, हॉटेलमध्ये एका महिलेशी संबंधित एका घटनेने सोशल मीडियावर वाद निर्माण केला आहे. ताज हॉटेलमध्ये एक महिला जेवणासाठी गेली. ती खूर्चीवर मांडी घालून बसून जेवण करत असताना तिला तेथील मॅनेजरने तिला कसे बसायचे ते शिकवण्यास सुरुवात केली. महिलेने घटनेचे वर्णन करणारा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. त्यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. श्रद्धा शर्मा असं या महिलेचं नाव असून त्या योरस्टोरी कंपनीच्या संस्थापक आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
श्रद्धा शर्मा आणि त्यांची बहीण दिवाळीच्या दिवशी हाऊस ऑफ मिंगमध्ये जेवत होत्या. यावेळी शर्मा या मांडी घालून बसल्या होत्या. तेव्हा हॉटेल मॅनेजरने त्यांना तिच्या बसण्याच्या पद्धतीबाबत फटकारले. मॅनेजरने सांगितले की इतर पाहुण्यांना तिची मुद्रा त्रासदायक वाटू शकते, म्हणून तिला व्यवस्थित बसण्याची सूचना देण्यात आली. श्रद्धा शर्माने एक्सवर पोस्ट करत म्हटले की, 'कठोर परिश्रम करून जेवणासाठी आलेल्या एका सामान्य माणसाला अजूनही ताज हॉटेलमध्ये अपमानित केले जाते. मी फक्त मांडी घालून बसले यावरून मला अपमानित केले जात आहे.'
हेही वाचा - Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस किती काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील? पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा
कपड्यांबाबतही टीका
फक्त बसण्यावरच नाही, तर मॅनेजरने तिच्या पारंपारिक सलवार-कमीज आणि कोल्हापुरी चप्पल घालण्याबाबतही टीका केली. शर्मा म्हणाल्या की, 'मी स्वतःच्या मेहनतीने कोल्हापुरी चप्पल विकत घेतली, पण हॉटेल कर्मचारी मला यावरून सूचना देत आहेत. हे बरोबर आहे का?'
हेही वाचा - Shilpa Shetty Bastian Earning : शिल्पा शेट्टी बॅस्टियन रेस्टॉरंटमधून कमावते कोट्यावधी ; या व्यक्तीने केली पोलखोल
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ताज हॉटेलवर टीका केली. काहींनी म्हटले, 'ब्रिटिश निघून गेले, पण त्यांचा इंग्रजीवाद हॉटेलमधून अजूनही दिसतो.' तर काहींनी हॉटेल कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केला, 'लोक पैसे देऊन आले आहेत, तरी त्यांना बसण्याची स्वातंत्र्य नाही का?'
हॉटेलने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही
दरम्यान, ताज हॉटेलने अद्याप या घटनेबाबत अधिकृत उत्तर दिलेले नाही. मात्र सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांमुळे या प्रकरणाने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे ताज हॉटेल व्यवस्थापनाच्या नियमांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.