Saturday, March 14, 2026 02:11:21 AM

Jay Pawar Post : “ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही” रोहित पवारांनंतर आता जय पवारांनी देखील व्यक्त केली शंका

अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली स्टोरी चर्चेत आली आहे. जय पवार यांनी देखील आता अजित पवार यांच्या अपघाती निधनावर शंका व्यक्त केली आहे.

jay pawar post  “ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही” रोहित पवारांनंतर आता जय पवारांनी देखील व्यक्त केली शंका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर आता तपासाला वेग आला आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानातला फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, विमानातल्या दोन्ही रेकॉर्डर्सवर भीषण अपघाताचा परिणाम झाला आहे. अपघातानंतर आगीत ब्लॅक बॉक्स दिर्घकाळ उच्च तापमानात राहिल्याने त्यातील दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान झाले आहे असं सांगण्यात आले आहे. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील नेत्यांकडून तसेच रोहित पवारांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा- Ajit Pawar Plane Crash: 'अजितदादांच्या विमानाचा स्फोट करण्यासाठी पायलटने ते मुद्दाम...'; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

असं असताना अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली स्टोरी चर्चेत आली आहे. जय पवार यांनी देखील आता अजित पवार यांच्या अपघाती निधनावर शंका व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी व्ही एस आर कंपनीवर बंदी घालण्याची देखील मागणी केली असून अपघाताची सखोल व निपक्षपाती चौकशी करावी अशी देखील मागणी केली आहे. जय पवार स्टोरीमध्ये म्हणाले आहेत की, “विमान अपघातात ब्लैक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाहीत; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे“. या पोस्टद्वारे अजित पवारांच्या निधनानंतर जय पवारांनी पहिल्यांदाच शंका व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.   

हेही वाचा- Praful Patel ON NCP Merger : "मी काहीही बोलणार नाही" दादांच्या अपघातासंबंधी 'त्या' आरोपांवर प्रफुल्ल पटेलांकडून टाळाटाळ
पिता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जय पवार हे सतत सोशल मीडियावर सक्रिय असलेले पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवर पिता अजित पवारांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट पाहता जय पवार हे पिता अजित पवार यांच्या अतिशय जवळचे असल्याचं समजतयं. जय पवार यांनी याआधी देखील अनेकदा अजित पवार यांच्यासोबतच्या त्यांच्या भावना सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केल्या आहेत. 


सम्बन्धित सामग्री