पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 26 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनानिमित्त शरद पवार गटाकडून पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले.
जयंत पाटील म्हणाले, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यश्र जयंज पाटील यांनी मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचाच आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा : Pune: वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून पोलीस हवालदार बेपत्ता
जयंत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे सुतोवाच
मला पवार साहेब यांनी बरीच संधी दिली. 7 वर्षे दिली. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील असे म्हणत जयंत पाटील यांनी राजीनामा देण्यात सुतोवाच दिले.
जयंत पाटलांच्या भाषणानंतर चर्चांणा उधाण आले. त्यावर मी राजीनामा दिला नाही. मला जे काही बोलायचं होतं ते मी भाषणात बोललो आहे. मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली आहे. पण पवार साहेबांनी स्वतः भाषणामध्ये याबाबत स्पष्टीकरण दिलं. शरद पवार म्हणाले, जयंत पाटील यांनी अतिशय प्रामाणिकपणे पक्षाच काम केलंय. त्यांनी सांगितलंय की नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही त्याला विरोध केला. जयंत पाटलांबाबत निर्णय घेताना पक्षातील सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. राज्यातील तालुक्या तालुक्यात नवे नेतृत्व उभा केलं जाईल असे म्हणत एक प्रकारे त्यांनी नव्या नेतृत्वाची घोषणा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवायच्या की स्वतंत्रपणे लढवायच्या याचा निर्णय जिल्हा नेतृत्व घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की नवीन नेतृत्वाचा निर्णय घेतला जाईल. पुढच्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांवर लक्ष केंद्रित केल जाईल असे शरद पवार यांनी सांगितले.