Saturday, June 14, 2025 03:21:56 AM

'जो मैं बोलता हु वो मैं करता हु'; बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचा फिल्मी अंदाज

शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जो मैं बोलता हु वो मैं करता हु बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचा फिल्मी अंदाज

प्रफुल खंडारे. प्रतिनिधी. बुलढाणा: बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांच्या स्वच्छतेवरून नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे. शहरातील स्वच्छतेबाबत माझ्याकडे वारंवार तक्रारी येत आहेत सूचना देऊनही नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडून शहरांची स्वच्छता केली जात नाही. सूचना दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जाते. मात्र त्यानंतरही स्वच्छतेबाबत तक्रारी येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट; आरोपी झिशान अख्तरला कॅनडात अटक

काय म्हणाले बुलढाणा जिल्हाधिकारी?

नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची भर बैठकीत झापले. शहरे स्वच्छ ठेवा अन्यथा तुमच्या विरोधात पहिला गुन्हा मी दाखल करेल', असं वक्तव्य किरण पाटील यांनी केले आहे. 'माझी सूचना इथेच राहील आता. सर्व नगरपालिकांनादेखील सर्व सध्याचे कत्तलखाने, आठवडी बाजार स्वच्छ ठेवतील याची काळजी सर्व स्वतःहून सीओंनी ते करतील, कॉम्प्लायन्स रिपोर्ट पाठवतील', असं जिल्हाधिकारी म्हणाले. 'जो मै बोलता हू... वो मे करता हु', असे म्हणत शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलेच झापले आहे. 


सम्बन्धित सामग्री