Monday, December 08, 2025 04:01:01 PM

Dhananjay Munde on Manoj Jarange : जरांगेंचे आरोप मुंडेंनी फेटाळले; जरांगेंना ठणकावलं, म्हणाले 'तुम्हाला महागात पडेल...'

या आरोपांचे धनंजय मुंडे यांनी परळी येथील जगमित्र कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन खंडन केले आहे. मुंडे म्हणाले की, 'त्यांच्याविरुद्ध केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि उद्देशपूर्ण बदनाम करण्यासाठी आहेत.'

dhananjay munde on manoj jarange  जरांगेंचे आरोप मुंडेंनी फेटाळले जरांगेंना ठणकावलं म्हणाले तुम्हाला महागात पडेल

Dhananjay Munde on Manoj Jarange: मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले. त्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचन्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचं स्पष्ट सांगितलं. जरांगे यांच्या मते, या कृत्यासाठी अडीच कोटींची सुपारी ठरवण्यात आली होती. जरांगे पाटलांच्या या दाव्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आता या आरोपांचे धनंजय मुंडे यांनी परळी येथील जगमित्र कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन खंडन केले आहे. मुंडे म्हणाले की, 'त्यांच्याविरुद्ध केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि उद्देशपूर्ण बदनाम करण्यासाठी आहेत.' ते म्हणाले की त्यांचे जरांगेशी वैयक्तिक कुठलतेही वैरभाव नाही. तथापी, जरांगे पाटलांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांनी तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. तसेच जरांगे यांनी स्वतःची व विरोधकांची नार्को टेस्ट व ब्रेन मॅपिंग करून सत्यता उघड करण्याची मागणी केली होती. धनंजय मुंडे यांनी या मागणीवर उत्तर देताना सांगितले की, 'तुम्ही तारीख आणि ठिकाण सांगा. आम्ही सगळे समोर येऊ. मग संपूर्ण महाराष्ट्र पाहिलं.' त्यांनी जरांगेना कर्मा रिपीट, अर्थात कर्माचा परिणाम भोगावा लागेल, असा इशाराही दिला. 

हेही वाचा - Manoj Jarange : 'मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी', मनोज जरांगे यांनी मोठ्या नेत्याच्या नावाचा केला खुलासा

कायदेशीर पाऊले व सार्वजनिक स्पष्टीकरण

धनंजय मुंडेंनी स्पष्ट केले की, ते मानहानीच्या तक्रारीसाठी वकीलांशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी लोकांना आग्रह केला की सार्वजनिक चर्चा संयमाने व्हावी आणि समाजात एकता राखण्याचा प्रयत्न केला जावा. मुंडे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा संदर्भ देत म्हटले की, ते गेली तीन दशकं लोकसेवा करतात. त्यांनी मराठा समाजासाठी ऐक्य निर्माण करण्यावर भर दिला. 

हेही वाचा - Bhaskar Jadhav Son: खेडमध्ये शिवसेना युवा जिल्हाप्रमुखावर हल्ला! आमदार भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, 'बीड जिल्ह्यात मी 80 हजार कुणबी प्रमाणपत्र वाटले. मनोज जरांगे यांचे उपोषणही मी सोडले आहे, 17 तारखेची सभा सोडली तर मी एकदाही त्याच्याविरोधत बोललो नाही. मनोज जरांगेना वाटते धनंजय मुंडे या पृथ्वीतलावर नसावेत. मराठा समाजाला ओबीसी की ईडब्लूएसमधून आरक्षण आहे, याचे उत्तर आणखी जरांगे यांनी दिले नाही. छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली पद्धत लोक विसरत आहेत, आपल्याला सर्वांना एकत्र येऊन घडी पुन्हा बसवायची आहे, असं आवाहनही यावेळी धनंजय मुंडेनी केलं.  
 


सम्बन्धित सामग्री