छत्रपती संभाजीनगर: निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी घबाडं सापडलं आहे. लाच घेताना खिरोळकरांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातून 58 तोळं सोनं आणि 3.5 किलो चांदी हस्तगत करण्यात आली. खिरोळकरांच्या घरातून एकूण 67 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरचे तिसगाव परिसरातील 6 एकर 16 गुंठे वर्ग-2 ची जमीन वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांनी तब्बल 41 लाखांची मागणी केली होती. त्यातील 23 लाख त्यांनी अगोदरच घेऊन ठेवले होते आणि मंगळवारी उर्वरित 18 लाखांपैकी 5 लाखांची लाच स्वीकारताना पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
हेही वाचा : हगवणे पिता-पुत्राला साथ देणाऱ्या पाच आरोपींना जामीन मंजूर
खिरोळकरच्या घरातून एकूण 67 लाखांची संपत्ती जप्त
कारवाईदरम्यान खिरोळकर यांच्या केबिनमध्ये 75 हजार रुपयांची रोख रक्कम, आयफोन आढळला. त्यानंतर खिरोळकरच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. यात 13 लाख रुपयांची रोख रक्कम, सुमारे 51 लाखांचे 589 ग्रॅम सोने, 3 किलो 553 ग्रॅम अशी सुमारे 3 लाख 40 हजारांची चांदी जप्त करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या घराची पोलिसांकडून झडती सुरू होती.
पोलिसांच्या झाडाझडीत घबाड हाती
एकूण 67 लाखांची संपत्ती जप्त
केबिनमध्ये 75 हजारांची रोकड जप्त
घरातून 13 लाखांची रक्कम ताब्यात
51 लाखांचं सोनं
3 किलो चांदी