Monday, March 09, 2026 01:44:44 AM

Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळे जिवंत असल्याचा दावा; धनंजय देशमुखांनी व्यक्त केली मनातील भीती, सरकारकडे 'ही' मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याच्या बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

santosh deshmukh case   कृष्णा आंधळे जिवंत असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी व्यक्त केली मनातील भीती सरकारकडे ही मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याच्या बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी मोठा धक्कादायक खुलासा केला आहे. कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला दिली आहे. कृष्णा तीनवेळ गावात येऊन गेल्याची माहिती खरी आहे. त्यांनी देखील हे मान्य केलं आहे की आरोपी गावात येऊन गेला. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. 

हेही वाचा- Ahilyanagar Crime News: नोकरीचे आमिष दिले, VCवर कपडे काढायला सांगायचा, तासनतास... NCP नेत्यावर 25 वर्षीय तरुणीचा गंभीर आरोप
दरम्यान यावेळी धनंजय देशमुख म्हणाले की, "सरकारी वकील निकम साहेब त्यांनी पहिल्या एक महिन्यात दीड महिन्यातच हा अर्ज दिलेला आहे. त्यावर येणाऱ्या सहा तारखेला आमच्याकडून त्याचा पाठपुरावा करण्याला आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. परंतु निकम साहेबांनी जे सरकारी वकील, सहाय्यक वकील आणि निकम साहेब यांनी याच्यात लक्ष घालून किंवा याचा पाठपुरावा करून जे सीज केलेले अकाउंट वगैरे आहेत ते! लवकरच जप्त करण्यात यावे यावर आम्ही एक ठोस पाऊल उचलणार आहोत. येणाऱ्या सहा तारखेला ते तुम्हाला बघायला भेटेल... ह्या सहा महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली. तीन वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला तीन वेळेस आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे".

"त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते. त्याच्या घरी येऊन तो तीन म्हणजे या सहा महिन्यामध्ये कुठल्या वेळेला आला काय एवढं डिटेल नाही. पण तो सहा वेळेला गावात येऊन आम्ही दिली होती. परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं त्यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून कारण आमच्या सगळ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. कारण, हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत. त्यांच समर्थन करणारे तिथेच आले हे आरोपी तिथेच आले तर त्या गोष्टीवर आम्ही मागणी केली आहे. लवकरात लवकर त्याच्या मुस्क्या आवळून त्याची पूर्ण जिल्ह्याभरात पोलिस प्रशासनाने त्याची धिंड काढून त्याला जेलबंद कराव. अशी आमची मागणी आहे आणि आमची ही मागणी लवकरच पूर्ण होईल अशी आम्ही अपेक्षा करतो." 


सम्बन्धित सामग्री