Wednesday, January 14, 2026 01:52:48 PM

Nitesh Rane on Tapovan Trees : 'झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही?'; नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद

प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना राहण्यासाठी सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यावरून..

nitesh rane on tapovan trees  झाडाला मिठी मारता मग बकरीला का नाही नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद

Nitesh Rane Conroversial Statement on Tapovan Trees Cutting : नाशिकमधील तपोवन परिसरात होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांच्या वास्तव्याकरिता सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. या साधूग्राममध्ये तपोवनमधील 54 एकर जागेचा समावेश आहे. मात्र, याच जागेवरील 1800 हून अधिक झाडे तोडण्याच्या नोटिशीमुळे पर्यावरणप्रेमी (Environmentalists) आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे, ज्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

राजकीय नेत्यांकडूनही नाराजी
नाशिक महानगरपालिकेने (NMC) तपोवनमधील सुमारे 1700 हून अधिक विविध प्रजातींच्या वृक्षांचे पुनर्रोपण (Transplantation) आणि काही फांद्यांची छाटणी करण्याबाबत नोटीस काढून नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता लक्षात येताच, केवळ पर्यावरणप्रेमीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनीही शेकडोंच्या संख्येने आक्षेप (Objections Over Tapovan Trees Cutting) नोंदवले. या संवेदनशील मुद्द्याने तात्काळ राजकीय वळण (Political Turn) घेतले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि अजित पवार या राज्याच्या प्रमुख नेत्यांनीही वृक्षतोडीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पर्यावरणाचे जतन करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा - Shital Tejwani Arrest: पुणे जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानीला अटक

नितेश राणेंचा 'धार्मिक' न्यायचा सवाल
या वादात कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उडी घेत झाडतोड (Tree Cutting) प्रकरणाला वेगळी दिशा दिली. त्यांनी थेट पर्यावरणप्रेमींना सवाल केला की, झाडाला मिठी मारता, मग बकरीला का मिठी मारत नाही? त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या सणांच्या वेळीच (Hindu Festival Time) असे प्रश्न उपस्थित केले जातात. बकऱ्यांच्या कत्तलीनंतर रक्ताचे पाणी वाहत असल्याचे अनेकवेळा पाहायला मिळते, पण तेव्हा पर्यावरणप्रेमी किंवा प्राणीप्रेमी आवाज उठवताना दिसत नाहीत.

कुंभमेळ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न
नितेश राणे यांनी असा सवाल केला की, "एका धर्माला एक आणि दुसऱ्या धर्माला एक न्याय कशासाठी?" ते म्हणाले की, झाडांना मिठी मारणे चांगली गोष्ट आहे आणि झाडे जगली पाहिजेत, हा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य मुद्दा आहे. मग बकरी हा प्राणी नाहीये का? तेव्हा प्राणीप्रेमी कुठे असतात? विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना उद्देशून ते म्हणाले की, काँग्रेसचे नेते होण्याआधी ते हिंदू (Hindu) आहेत, हे ते विसरले असावेत. इतर धर्मांच्या सणांच्या वेळी हे लोक गप्प का राहतात, हा माझा प्रश्न आहे.

हेही वाचा - Ajit Pawar: पर्यावरण वाचलं तरच... 'तपोवन' प्रकरणी अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुतीत वादाचा खडा

'कुंभमेळा हा एकट्या भाजपचा कार्यक्रम नाही'
नितेश राणे यांनी कुंभमेळ्याला बदनाम केले जात असल्याचा थेट आरोप केला. कुंभमेळ्यासाठी साधूग्रामकरिता जागा तयार केली जात आहे आणि झाड तोडणे हा मुद्दा वेगळा आहे. कुंभमेळ्याच्या तयारीची काही लोकांना ॲलर्जी झालेली आहे, असे ते म्हणाले. "कुंभमेळा हा भाजपचा कार्यक्रम आहे का?" असा सवाल करत, हिंदू समाजाच्या कार्यक्रमावेळीच अचानक प्रश्न विचारले जात असतील आणि झाडांना मिठी मारली जात असेल, तर प्रश्न विचारायचा नाही का? बकऱ्या कापल्या जातात तेव्हाही पर्यावरणाची हानी (Environmental Damage) होते. तेव्हा प्रश्न विचारण्याऐवजी हे लोक कुठे असतात, अशी टीका त्यांनी केली.


सम्बन्धित सामग्री