यवतमाळ : शेतातील विहरीत बिबट्या पडला. विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील डेहणी येथील घटना आहे.
हेही वाचा : अवकाळीने कांदा गेला वाहून, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मुलीची आर्त हाक
गेल्या अनेक दिवसांपासून दिग्रस तालुक्यात बिबटा असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्या चर्चा खऱ्या ठरल्या असून वानराची शिकार करताना बिबटा व वानर विहरीत पडल्याची घटना आज घडली. वन विभागाच्या टीमने विहरीत पिंजरा सोडला आणि पिंजरा बंद करण्यात आले. आज दिग्रस तालुक्यातील डेहणी येथील रामु रामजी चव्हाण यांच्या शेतात अचानकपणे बिबटा वानराचा पाठलाग करताना दृष्टीस पडला. बिबट्याने वानरावर झेप घेऊन पकडले सुद्धा परंतु शेतात असलेल्या विहरीत बिबट्या व वानर कोसळले. तातडीने वन विभागास माहिती देण्यात आली. शेख मुखबिर पप्पूवाले यांच्या नेतृत्वात रेस्क्यू टीमने विहरीत पिंजरा सोडला. परंतु सायंकाळी 5 वाजेपर्यंत बिबटा पिंजऱ्यात आला नाही. अथक परिश्रमानंतर बिबट्यास अखेर पिंजऱ्यात बंद करण्यात आले. या रेस्क्यू दरम्यान वन विभागाचे अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.