Wednesday, July 09, 2025 10:22:16 PM

लोणीकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मालेगावात महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन

लोणीकर यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा मालेगावात तीव्र निषेध, जोडे मारो आंदोलन करत माफी आणि कारवाईची मागणी.

लोणीकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मालेगावात महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन

मालेगाव: मालेगावात भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी विरोधात केलेल्या निंदनीय वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी पुतळा, मोसमपुल येथे हे आंदोलन झाले. आंदोलनादरम्यान लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करत निवेदन अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांना देण्यात आले.

लोणीकर यांनी एका कार्यक्रमात 'तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले, तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बूट, मोबाईल पण मोदींनी दिला' असे विधान केले होते. या वक्तव्यामुळे त्यांची व त्यांच्या पक्षाची शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता स्पष्ट होते, असे आंदोलकांनी सांगितले. आमदारकीचा संपूर्ण खर्च जनतेच्या पैशातून चालतो हे विसरून लोणीकर सामान्य जनतेविषयी अपमानास्पद शब्द वापरत आहेत, असा आरोप करण्यात आला.

हेही वाचा: कामाच्या बहाण्याने नाशिकला नेऊन अल्पवयीन मुलीची विक्री

या आंदोलनात महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी सरकारने तत्काळ लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

या आंदोलनात संदीप पवार, जितेंद्र देसले, शरद खैरणार, अरुण देवरे, सलीम रिजवी, दिनेश ठाकरे, कैलास तिसगे, शेखर पवार, हमीदभाई लकडावाला, दिपक बच्छाव, दिनेश पाटील, श्रीकृष्ण सोनावणे, अजय वाघ, अशोक निकम, भाऊसाहेब अहिरे, भाऊसाहेब पवार, सुरेश गवळी, हर्षल पवार, प्रशांत जाधव, संजय चव्हाण, बाबुराव बच्छाव, अतुल मोरे, कपिल अहिरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


सम्बन्धित सामग्री