बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणी काही आरोपींना अटकदेखील करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो जीवंत आहे की नाही? अशी शंका व्यक्त केली जात आहे. आता त्याबद्दलच एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी मोठा धक्कादायक खुलासा केला आहे.
संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी सांगितले की, कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला दिली आहे. कृष्णा तीनवेळ गावात येऊन गेल्याची माहिती खरी आहे. त्यांनी देखील हे मान्य केलं आहे की आरोपी गावात येऊन गेला. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. पण आरोपी मोबाईल वापरत नाही. त्यामुळे तपास यंत्रणांना त्याला शोधण्यात अडचण येत आहे.
हेही वाचा - Chhtrapati Sambhajinagar : पोलीस भरतीचं स्वप्न राहिलं अपुरं! धावताना लागला दम आणि क्षणात सोडला जीव, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मात्र यावर काय करायचं आणि कशा पद्धतीत त्या आरोपीला जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करू. कारण या आरोपीपासून आमच्या सर्व कुटुंबाला जीवितास धोका आहे. हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सर्व लोक आहेत. लवकरात लवकर कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळून पोलीस प्रशासनाने त्याची धिंड काढावी अशी मागणी आम्ही केली आहे.
हेही वाचा - Gas Tanker Explosion : गॅस टँकर उलटल्याने भीषण स्फोट; 4 जणांचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत आरोपी पक्षाला सर्व कागदपत्राची पूर्तता करा. कोर्टाच्या सरकारी पक्षाला सूचना देण्यात आल्या आहेत. आरोपी क्रमांक तीन ते सात यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बदलण्यात यावे या केलेल्या अर्जावर आज सरकारी पक्षाकडून म्हणणे लेखी म्हणणे सादर केले जाणार. विष्णू चाटे यांच्या जेल बदलीच्या अर्जावर आज ऑर्डर येण्याची शक्यता आहे. आरोपी जयराम चाटे कडून वकील बदलला आहे. सध्या नवीन वकील म्हणून एम. के. वाघीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.