मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पहिल्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप-शिंदे युती 20 जागांवर आघाडीवर होती, तर ठाकरे गट 13 जागांवर होता. त्यानंतर आकडे बदलून भाजप-शिंदे युती 22 ते 23 जागांवर पुढे होती.
10.45 : काँग्रेसला पाच जागांवर आघाडी मिळाली, तर मनसे तीन जागांवर आघाडीवर होती. हे आकडे सातत्याने बदलत असून, मुंबईतील 46 जागांचे पहिले कल हाती आले आहेत.
मुंबईच नव्हे, तर नागपूर, पुणे आणि ठाण्यासह एकूण 29 महापालिकांचे निकालही येत आहेत. नागपूरमध्ये भाजपने पाच जागांवर आघाडी घेतली आहे, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रमी विजयाची आशा व्यक्त केली होती.
10.54 AM : महापालिकेचे कल हाती येत असून मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार कामगिरी केल्याचे बघायला मिळत आहे. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट 50 जागांवर आघाडीवर आहे.
11.15 AM: दहिसर प्रभाग क्रमांक मधून शिंदे यांच्या शिवसेनेच्या रेखा यादव आघाडीवर आहेत.
वॉर्ड क्रं 124 मधून ठाकरेच्या उमेदवार सकीना शेख आघाडीवर आहेत.
11.20 AM : वॉर्ड क्रं 135 मधून भाजपचे नवनाथ बन पिछाडीवर आहेत.
वॉर्ड क्रं 165 काँग्रेसचे अश्रफ आझमी आघाडीवर आहेत.
11.24 AM : मुंबईत 227 पैकी 159 जागांचे कल हाती आले आहेत. भाजप, शिवसेना महायुती 80 जागांवर आघाडीवर आहे.
ठाकरे बंधु 64 जागांवर आघाडीवर आहेत.
भाजप 55 जागांवर आघाडीवर.
एकनाथ शिंदे शिवसेना 20 जागांवर आघाडीवर.
उद्धव ठाकरे गट 57 जागांवर आघाडीवर
मनसे 7 जागांवर आघाडीवर आहे.
काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर आहेत.
11.36 AM : मुंबईतून पहिला निकाल ; काँग्रेसच्या आशा काळे विजयी
11.37 AM : भाजपाचे नवनाथ बन प्रभाग क्रमांक 135 मधून 506 मतांनी पुढे
11.38 AM भाजपचे अजय पाटील आघाडीवर
11.39 AM : मुंबई प्रभाग 2 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी
11.42 AM : मुंबई प्रभाग 135 मधून नवनाथ बन विजयी
12.02 PM : अजित पवारांना मुंबईत मोठा धक्का; नवाब मलिकांचा भाऊ कप्तान मलिक पराभूत
12.17 PM : सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर पराभूत, ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी
12.44 PM : भाजपाची मुंबई महापालिकेत विजयी वाटचाल, तब्बल 80 जागांवर आघाडी
1.20 PM : भाजपचे रवी राजा यांचा पराभव, ठाकरे गटाचे टी.एम. जगदीश विजयी
1. 25 PM : प्रभाग क्रमांक 210 मधून उबाठा गटाचे उमेदवार सोनम जमसुतकर विजयी
1.48 PM : नवी मुंबई सीवूडमधून उबाठाचे विशाल विचारे विजयी
मुंबईचा दुपारी 1. 30 PM वाजताचा कल
भाजप 29, तर शिवसेना 10 ठिकाणी आघाडीवर
ठाकरे गट 19 व मनसे 2 ठिकाणी आघाडीवर
काँग्रेस 7,तर एमआयएम 4 ठिकाणी आघाडीवर
सपा, अपक्ष प्रत्येकी एका ठिकाणी आघाडीवर
1.48 PM : भायखळा
प्रभाग क्रमांक २११
समाजवादी पार्टी आणि काॅग्रेसमध्ये काटेकी टक्कर
वकार खान काॅग्रेस २५९१
एजाज अहमद (अज्जू) समाजवादी पार्टी - २४२३
मंगेश पांगारे प्रभाग क्रमांक ४ शिवसेना विजयी
1.48 PM : मुलुंड प्रभाग क्रमांक 106 मध्ये पहिल्या तीन फेरीत आघाडीवर असलेले मनसेचे सत्यवान दळवी चौथ्या फेरीत पिछाडीवर
दोघांमध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपचे प्रभाकर शिंदे यांना 11912 मतं पडली आहेत तर मनसेचे सत्यवान दळवी 11769 मतं पडली आहेत
भाजपचे प्रभाकर शिंदे हे 143 मतांनी विजयी
2.05 PM : शिवडी मतदार संघातील प्रभाग क्रमांक 202 आणि 203 याच्या मतमोजणीला सुरुवात
प्रभाग क्रमांक 202 मधील लढती.
श्रद्धा जाधव – शिवसेना UBT
पार्थ बावकर – भाजपा
प्रमोद नाना जाधव – वंचित
विजय इंदुरकर – अपक्ष
अजित धोत्रे अपक्ष
अजित मुणगेकर अपक्ष
प्रतीक कांबळे बसपा
प्रभाग क्रमांक 203 मधील लढती.
श्रद्धा पेडणेकर – शिवसेना UBT
समिधा संदीप भालेकर – शिवसेना शिंदे
दिव्या बडवे अपक्ष
विनिता राणे अपक्ष
संगीत शितोळे अपक्ष
2.11 PM : वाॅर्ड क्रमांक २१६
गौरी नरवणकर (भाजप) - ६७६५
राजश्री नागरे (मनसे) - २२९८
राजश्री भातणकर (कांग्रेस) - ९४६४
कांग्रेसच्या राजश्री भातणकर विजयी
2.23 PM : वार्ड क्रमांक 74 तिसरी फेरी
विद्या भरत आर्या- कांगणे (मनसे) - 6942
समिता नितीन सावंत (काँग्रेस)- 3344
उज्वला श्रीकृष्ण मोडक ( भाजप)- 6905
भाजपच्या उज्जला मोडक 37 मतांनी पिछाडीवर
2. 28 PM : वार्ड क्रमांक ७५ तिसरी तिसरी फेरी
उमेश सूर्यकांत राणे (भाजप) - 6957
प्रमोद पांडुरंग सावंत (शिवसेना ubt) - 10168
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमोद सावंत 3211 मतांनी आघाडीवर
2.50 PM : दुसऱ्या फेरीनंतर आघाडीवर
प्रभाग क्रमांक – 203
श्रद्धा पेडणेकर – 2738 शिवसेना UBT – आघाडीवर
समिधा संदीप भालेकर –2125 शिवसेना शिंदे
2.51 PM : पाचव्या फेरीनंतर समाजवादी पक्षाच्या इरम सिद्दिकी विजयी.
प्रभाग क्रमांक – 201
इरम सिद्दिकी - 6317 समाजवादी
सुप्रिया मोरे - 5787शिवसेना (शिंदे)
अन्वर अली –3791 MIM – पिछाडीवर
3.02 PM : तिसऱ्या फेरीनंतर आघाडीवर
प्रभाग क्रमांक – 202
श्रद्धा जाधव – 7079शिवसेना UBT – आघाडीवर
पार्थ बावकर 4860 भाजप
3.12 PM :
चौथ्या फेरीनंतर आघाडीवर
प्रभाग क्रमांक – 203
श्रद्धा पेडणेकर – 10842 शिवसेना UBT – आघाडीवर
समिधा संदीप भालेकर –6338 शिवसेना शिंदे
3.18 PM : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार विजयानंतर पद्मजा चेंबूरकर यांचा जल्लोष
3.19 PM : मुलुंड प्रभाग क्रमांक - 105
भाजप अनिता वैती - 14742
उद्धव सेना अर्चना चवरे - 9762
भाजपा विजयी 4980 मतांनी विजयी
3.23 PM : मुलुंड प्रभाग क्रमांक 107 मधून नील किरीट सोमय्या यांची दुसऱ्या फेरीत आघाडी कायम आणि 108 मधून दीपिका घाग दुसऱ्याला फेरीत आघाडीवर
3. 29 PM : प्रभाकर शिंदे 164 मतांनी विजयी आहे
3.41 PM : मुलुंड मध्ये मतमोजणी दरम्यान मतमोजणी कार्यालयात गोंधळ प्रभाग क्रमांक 107 ची मतमोजणी सुरू असताना नील सोमय्या यांच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुरस्कृत उमेदवार दिनेश जाधव यांनी आक्षेप घेतल्याने झाला गोंधळ
4.04 PM : विजयानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवला
4.06 PM : विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत विजयी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
4.08 PM : नितेश राणे यांनी ट्विट मध्ये हसत ठाकरेंना डिवचले
आदित्य ठाकरे यांना पेंग्विन म्हणत डिवचल
उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जय श्री राम म्हटलं
4.15 PM : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना फोन
4.32 PM : मुलुंड प्रभाग क्रमांक 108 मधून भाजपच्या दीपिका घाग विजयी
4.36 PM : मुलुंड प्रभाग क्रमांक १०७ मधून नील सोमय्या मोठ्या मतांनी विजयी
नील सोमय्या यांना २१,२२९ मतं मिळाली
4.55 PM : कांग्रेसच्या उमेदवार पृथ्वी जैन वाॅर्ड क्रमांक २२१ मधून आघाडीवर, २ हजार ७३ मतं
आम आदमी पार्टीचे जुनैद खान वाॅर्ड क्रमांक २२१ मधून दुसऱ्या क्रमांकावर
भाजपचे माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांना पहिल्या फेरीत फक्त ३०२ मतं
आम आदमी पार्टीचे उमेदवार जुनैद खान यांना १ हजार ६०२ मतं घेत दुसऱ्या क्रमांकावर
4.57 PM : प्रभाग क्रमांक 77
आंबोळकर प्रियंका- शिंदेसेना - 6658
शिवानी परब- शिवसेना उद्धव ठाकरे - 15431
शिवानी परब 8 हजार 773 मतांनी विजयी
5.00 PM : भायखळ्याच्या मतमोजणी केंद्रवर राहुल नार्वेकर दाखल
कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले स्वागत
तिन्ही सिट जिंकणार असा केला विश्वास
विरोधकाना हे उत्तर असल्याचा पलटवर
विभाग क्रमांक 199 च्या उमेदवार माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा विजय
5.03 PM : पाचव्या फेरीनंतर :विजयी
प्रभाग क्रमांक – 204
ओंकार (किरण ) तावडे - 14796 शिवसेना UBT – विजयी
अनिल कोकिळ -11114 शिवसेना शिंदे
5.26 PM : प्रभाग क्रमांक 77
आंबोळकर प्रियंका- शिंदेसेना - 6658
शिवानी परब- शिवसेना उद्धव ठाकरे - 15431
शिवानी परब 8 हजार 773 मतांनी विजयी
5.30 PM : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश कार्यालय येथे उपस्थित
5.55 PM : दुसऱ्या फेरीअखेर आघाडीवर
प्रभाग क्रमांक – 206
सचिन पडवळ शिवसेना (ठाकरे ) 7305 आघाडीवर
संजय (नाना ) आंबोले - 2817शिवसेना (शिंदे) 1489