Wednesday, June 18, 2025 01:33:55 PM

महाराष्ट्र दहावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार; विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

दहावीचा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असून MSBSHSE कडून पत्रकार परिषदेत तपशीलवार माहिती दिली जाईल.

महाराष्ट्र दहावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) आयोजित दहावीच्या परीक्षेचा निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत पार पडल्या होत्या. निकालाच्या दिवशी मंडळातर्फे पत्रकार परिषद घेण्यात येईल, ज्यामध्ये एकूण यश टक्केवारी, मुलं व मुलींचे निकाल, तसेच जिल्हानिहाय कामगिरी याची माहिती दिली जाईल.

jaimaharashtrnews

निकाल कुठे आणि कसा पाहायचा?

विद्यार्थी आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात:

  • mahresult.nic.in
  • sscresult.mkcl.org
  • sscresult.mahahsscboard.in

निकाल पाहण्याची पद्धत:

1. दिलेल्या वेबसाइटपैकी कुठल्याही एका संकेतस्थळाला भेट द्या.

2. "Maharashtra SSC Result 2025" या लिंकवर क्लिक करा.

3. आपले रोल नंबर किंवा हॉलतिकिट क्रमांक व नाव टाका.

4. 'Submit' वर क्लिक करताच निकाल स्क्रीनवर दिसेल.

5. सर्व माहिती नीट तपासून आपली गुणपत्रिका डाउनलोड करून ठेवा.

अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया फक्त ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश जाहीर केला. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालयांची निवड करता येणार असून, चार फेऱ्यांमधून प्रवेश देण्यात येणार आहे. चौथ्या फेरीनंतर "सर्वांसाठी खुला प्रवेश" ही विशेष फेरी जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करताना खालील गोष्टी भराव्यात:

वैयक्तिक माहिती

दहावीचे गुणपत्रक

प्राधान्यक्रमानुसार निवडलेली महाविद्यालये

पालकांसाठी सूचना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा

पालकांनी आपल्या पाल्यांना मानसिक आधार देत त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. निकाल काहीही असो, तो केवळ पुढच्या वाटचालीतील एक टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांची शहानिशा करून योग्य महाविद्यालयाची निवड करावी. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी 'ट्रेंडी' टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा


सम्बन्धित सामग्री