Friday, March 13, 2026 07:26:10 AM

Aditi Tatkare Vidhan Sabha : 'ते असताना कणभर जरी प्रशंसा झाली असती तर...', अजित दादांच्या आठवणीमुळे अदिती तटकरेंच्या डोळ्यांत पाणी

अजित पवार यांचं दु:खद निधन झालं, त्यावेळेला सगळेच त्यांच्या कामाचं कौतुक करत होते.

aditi tatkare vidhan sabha  ते असताना कणभर जरी प्रशंसा झाली असती तर अजित दादांच्या आठवणीमुळे अदिती तटकरेंच्या डोळ्यांत पाणी

अजित पवारांबद्दल बोलताना आज प्रत्येक नेता गहिवरलेला पाहायला मिळाला. महिला आणि  बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्या खूप भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी त्या म्हणाल्या की, अजित पवार यांचं दु:खद निधन झालं, त्यावेळेला सगळेच त्यांच्या कामाचं कौतुक करत होते. 

एक कार्यकर्ता म्हणून वाटायचं की हयातीत त्यांच्याबद्दल जे ऐकायचं होतं, त्यांनी या राज्यासाठी काय केलं, महाराष्ट्रासाठी काय केलं ते दुर्दैवानं ते नसताना ऐकायला मिळतंय. आज जे ऐकायला मिळतंय ते असताना कणभर जरी प्रशंसा झाली असती तर काम करण्याचं प्रोत्साहन त्यांना मिळालं, असतं, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 

हेही वाचा - Rohit Pawar Vidhan Sabha : काकाचा शोकप्रस्ताव, पुतण्या सभागृहात ढसाढसा रडला, काकींना शब्द दिला...

28 जून 2024  रोजी त्यांनी अर्थसंकल्प सादर केला, ज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो, त्या नेत्याच्या नेतृत्त्वात आपण काम करत असतो. तो नेता आपला अभिमान असतो, तो नेता आपला माज असतो, हा आमचा रुबाबदार नेता,चालत यायचे तेव्हा तो रुबाबदार पणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा. 


सम्बन्धित सामग्री