Sunday, March 08, 2026 01:45:57 PM

Devendra Fadanvis on Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट, लवकरच...

या कर्जमाफीसाठी सरकार काय तयारी करत आहे, याबाबतही त्यांनी सांगितले आहे.

devendra fadanvis on loan waiver   शेतकऱ्यांसाठी खुशखबर  कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट लवकरच

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.  यावेळी महाराष्ट्रासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस, शेतकरी कर्जमाफी, भ्रष्टाचाराची प्रकरणं या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवूनही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, तसेच या कर्जमाफीसाठी सरकार काय तयारी करत आहे, याबाबतही त्यांनी सांगितले आहे.

कर्जमाफीबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही एक समिती तयार केलेली आहे. या समितीचा अहवाल अपेक्षित आहे. कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही जे आश्वासन दिलेले आहे ते आम्ही योग्य वेळी पूर्ण करणारच आहोत. त्याचप्रमाणे आपण शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहोत. या रेकॉर्डमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, सातबाराचा अहवाल यांची यात नोंद असेल. हा डिजिटल रेकॉर्ड, आधार क्रमांक या सर्व गोष्टी एकत्रित ठेवून कर्जमाफीबाबत विचार केला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


सम्बन्धित सामग्री