Sunday, March 08, 2026 11:23:00 PM

Raigad ZP Election Result: रायगडचा 'कौल' कोणाला? ; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. 59 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समिती जागांसाठी 69.91 टक्के मतदान झाले होते.

raigad zp election result रायगडचा कौल कोणाला  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

रायगड: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी मतदान पार पडले होते. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.

कोकणातील महत्त्वाचा जिल्हा मानल्या जाणाऱ्या रायगडमध्येही चुरस पाहायला मिळाली होती. रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 69.91 टक्के मतदानाची नोंद झाली होती. ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला होता.

आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होत असून, प्रत्येक फेरीकडे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कोण आघाडी घेतो आणि कोणाचा झेंडा फडकतो, याचा निकाल काही तासांत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

हेही वाचा: Sindhudurg ZP Election Result: सिंधुदुर्गचा 'कौल' स्पष्ट; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर; विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे

अनिल जाधव (शिवसेना) – महाड पंचायत समिती, सवाने धामणे पंचायत समिती गण

अवनी राऊळ (अपक्ष) – माडखोल जिल्हा परिषद गट, सावंतवाडी

प्रेरणा सावंत (शिवसेना) – दासगाव पंचायत समिती, महाड

साबिरा पाचकर (शिवसेना) – दासगाव पंचायत समिती

अमित नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) – शहापूर जिल्हा परिषद गट, अलिबाग

रसिका केणी (शिवसेना) – आंबेपूर जिल्हा परिषद गट

मन्सुर ताज (शिवसेना) – दासगाव जिल्हा परिषद मतदार संघ, महाड

लहू म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस) – म्हसाळा पंचायत समिती, खरसई गण (रायगड)

अनिल बसवत (राष्ट्रवादी काँग्रेस) – पाभरे जिल्हा परिषद गट, म्हसळा तालुका

प्रथमेश सावंत (अपक्ष) – माडखोल पंचायत समिती, सावंतवाडी

अवनी राऊळ (अपक्ष) – माडखोल जिल्हा परिषद पंचायत समिती (सावंतवाडी)

प्रेरणा सावंत (शिवसेना) – दासगाव पंचायत समिती (महाड)

साबिरा पाचकर (शिवसेना) – दासगाव पंचायत समिती

भाई शिंदे (शिवसेना) – तळा पंचायत समिती, खानाव गण (खालापूर)

गौरी गडगे (शिवसेना) – वाशिवली पंचायत समिती (खालापूर)

नेताजी पाटील (शिवसेना) – गोळप पंचायत समिती

विकास गोगावले (शिवसेना) – रायगड जिल्हा परिषद, नडगाव तर्फे बिरवाडी

मानसी दळवी (शिवसेना) – थळ गटातून विजयी

अमित नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) – शहापूर जिल्हा परिषद गट (अलिबाग)

रसिका केणी (शिवसेना) – आंबेपूर जिल्हा परिषद गट

मन्सुर ताज (शिवसेना) – दासगाव जिल्हा परिषद मतदारसंघ (महाड)

गीता जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस) – चरई खुर्द (तळा तालुका)

नलिनी लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – रहाटाड (तळा तालुका)

दिलीप भोईर (शिवसेना) – आवास जिल्हा परिषद गट, अलिबाग

वरील यादी निकाल जसे हाती येतील त्याप्रमाणे अद्यावत केली जात आहे.

हेही वाचा: ZP Election Result 2026: पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची जादू; राष्ट्रवादी अनेक ठिकाणी आघाडीवर


सम्बन्धित सामग्री