सोशल मिडीयावर आजकाल काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सरकारी कर्मचारी, शिक्षक, राजकिय नेते यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. अशातच आता कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आमदारांच्या पाहाणी दौऱ्यात दारूच्या नशेत दिसून आले. इचलकरंजी येथील तलाठीवर आमदारांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार,इचलकरंजी येथील जुना सांगली नाका परिसरात आमदार राहुल आवाडे पाहाणी करताना सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत दिसून आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : 'मी यातून लवकरच बाहेर पडेन...'; संजय राऊत यांनी स्वतःचं दिली प्रकृतीची माहिती, पंतप्रधान मोदींचेही मानले आभार
आमदार आवाडे यांनी त्याची गांभिर्याने दखल घेत सहाय्यक तलाठ्याचे वैद्यकिय तपासणी करुन तात्काळ निलंबित करण्याच्या सूचना वरिष्ठांना केल्या आहेत. आमदार आवाडे यांनी डवरी यांना बोलावून चौकशी केली असता त्यांना धड बोलताही येत नव्हते.
हेही वाचा - Devendra Fadanvis On Phaltan Doctor Case : फलटण डॉक्टर मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना महत्त्वाचे आदेश, प्रकरणाला काय वळण लागणार ?
आमदारांच्या सूचनेनुसार आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.