कोल्हापूर: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. कोल्हापूरमध्ये चुरस शिगेला पोहोचली असून, एकीकडे भाजपने विजयाचा चौकार मारला असतानाच आता काँग्रेसनेही आपले खाते उघडले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावातूनही भाजपसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
कोल्हापुरात चुरस - चार जागांवर भाजप, तर काँग्रेसची एन्ट्री
कोल्हापूर महानगरपालिकेत सतेज पाटील आणि महायुती यांच्यातील संघर्षात आता प्रत्येक जागा महत्त्वाची ठरत आहे.
भाजपचा विजय - कोल्हापुरात आतापर्यंत भाजपचे प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते आणि विजेंद्र माने हे चार उमेदवार अधिकृतपणे विजयी झाले आहेत.
काँग्रेसचे खाते उघडले - सुरुवातीच्या पिछाडीनंतर कोल्हापुरात काँग्रेसने आपले खाते उघडले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
हेही वाचा: Sanjay Raut : आमचे नगरसेवक फुटणार नाहीत, काँग्रेसची मदत नक्की घेऊ; निकालाआधीच राऊतांची धाकधूक वाढली?
जळगावात भाजपचा शंखनाद
जळगाव महानगरपालिकेतून मोठी बातमी हाती आली आहे. भाजपचे राजेंद्र घुगे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. जळगावात महायुतीची लाट पाहायला मिळत असून, राजेंद्र घुगे यांचा विजय हा भाजपच्या स्थानिक रणनीतीचा मोठा विजय मानला जात आहे.
इतर महत्त्वाचे अपडेट्स:
इचलकरंजी: येथेही भाजपने आपले वर्चस्व राखत चार जागांवर विजय मिळवला आहे.
लातूर: काँग्रेसचे वर्चस्व कायम असून देशमुखांच्या बालेकिल्ल्यात पंजा मजबूत होताना दिसत आहे.
पुणे: काँग्रेसचे प्रशांत जगताप अजूनही आघाडीवर आहेत, तर वसंत मोरे यांच्यासाठी निकालाची प्रतीक्षा कायम आहे.
हेही वाचा: Maharashtra Elections Result Live Update : 29 महानगरपालिकांचा ‘महा’निकाल! मुंबईत महायुतीचा बोलबाला तरी ठाकरेंची हवा…, सत्तेचा कल कोणाकडे? धक्कादायक अंदाज समोर