Monday, March 09, 2026 01:53:54 AM

Matheran e-Rikshwa News : मोठी बातमी! माथेरानमध्ये उद्यापासून इ-रिक्षा चालकांचा संप, स्थानिकांसह पर्यटकांची होणार कोंडी

matheran e-rikshwa news   मोठी बातमी माथेरानमध्ये उद्यापासून  इ-रिक्षा चालकांचा संप स्थानिकांसह पर्यटकांची होणार कोंडी

माथेरानमध्ये हात रिक्षा ओढणारे श्रमिक प्रवाशांसाठी रात्रंदिवस फेऱ्या मारत असतात. त्यांचे कष्ट कमी होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पर्यावरण पुरक इ रिक्षा देण्याचा निर्णय दिला होता.मात्र 6 महिन्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे उद्या 10 फेब्रुवारीपासून इ रिक्षा बंद असणार आहेत. माथेरानमधील 94 हातरिक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सध्या 20 हात रिक्षा चालकांना इ-रिक्षा मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर श्रमिक रिक्षा संघटनेनं ई-रिक्षा आणि हातरिक्षा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हातरिक्षा ही अमानवीय प्रथा असून सहा महिन्यांच्या आत 94 हातरिक्षा बंद करण्याचे निर्देश गवई यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी दिले होते.

हेही वाचा - ZP Election results 2026 : जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची ? 10 वाजता होणार मतमोजणीला सुरुवात, अपडेट्स जाणून घ्या 

हजारो पर्यटक विकेंड ट्रिपसाठी माथेरानला येतात. कारण या ठिकाणी वर्षभर थंड आणि आल्हाददायक वातावरण असतं. विशेषत: पावसाळ्यात हिरवागार निसर्ग, धबधबे आणि ट्रेकिंगचा थरार माथेरानमध्ये पाहायला मिळतो. पंरतु, आता माथेरानच्या ई-रिक्षाच्या सुविधेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. माथेरानमध्ये येत्या 10 फेब्रुवारीपासून इ-रिक्षा बंद असणार आहेत. 


सम्बन्धित सामग्री