Monday, March 09, 2026 07:59:48 AM

Mohan Bhagwat : लोकसंख्या,धर्मांतर आणि घुसखोरांबद्दल काय म्हणाले मोहन भागवत?

धर्मांतर आणि घुसखोरांबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

mohan bhagwat   लोकसंख्याधर्मांतर आणि घुसखोरांबद्दल काय म्हणाले मोहन भागवत

 मुंबईतील वरळी डोममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम  सुरू आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी सरसंघाचलक मोहन भागवत यांनी सर्वांशी संवाद साधला. त्यांनी आपले विचारदेखील मांडले. यावेळी त्यांनी  लोकसंख्या, धर्मांतर आणि घुसखोरांबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

घुसखोरीबाबत सरकारने खूप काही केलं पाहिजे. डिटेक्ट आणि डिपोर्ट केलं पाहिजे. सेन्सेक्स आणि एसआयआर होत आहे. आम्ही एक गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे डिटेक्शन. जे लोक येतात त्यांच्या भाषणातून दिसतं. योग्य अधिकारी आणि पोलिसांना सांगा. तुम्ही चौकशी करा. कोणत्याही विदेशीला रोजगार द्यायचा नाही. 

हेही वाचा - Sunil Gavaskar Warning: विजयानंतरही सुनील गावस्कर संतापले; टीम इंडियाला दिला 'हा' कडक इशारा, म्हणाले 'जर हे दुर्लक्ष केलं तर...'

मुसलमान असला तरी रोजगार देऊ. पण विदेशींना देऊ नये. त्यामुळे डोळे उघडून पाहा. छोटे काम करणारेही हे लोक दिसत आहे. हिंदू समाजात अनेकांनी छोटी कामं सोडली आहेत. सर्व मोठ्या कामाच्या मागे लागले आहेत. त्यामुळे जिथे कोणी नसतं तिथे या विदेशी लोकांचा रोजगार पक्का होता. कुणाचा रोजगार मारायचा नाही.

पण सर्व प्रकारच्या कामात आपले लोक असावेत. हिंदू नाहीत, पण या देशातील आहेत त्यांना काम दिलं पाहिजे. आपण ते करू शकतो, असे मोहन भागवत म्हणाले.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या