आजकाल डिजीटल फसवणूकीच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायाक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात सायबर चोरट्यांकडून वयोवृद्धाला तब्बल 10 कोटी 75 लाख रुपयांचा चुना लावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायबर चोरट्यांनी वर्चुअल कोर्ट तयार करत ज्येष्ठ नागरिकाला धमकावून कोट्यवधी रुपये लुटले.
समोर आलेल्या माहितीनुसार, या चोरट्यांनी देशभरात गाजलेल्या जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचे नाव निष्पन्न झाल्याची धमकी देत सेवा निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढले आणि लुटले. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar Crime : आधी खेचत कोपऱ्यात नेलं आणि मग...; छत्रपती संभाजीनगरमधील तरुण-तरूणीचा Video Viral
या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून सायबर पोलिस ठाण्यात आता अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 23 जानेवारी ते 31 जानेवारी रोजी घडला. 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे पुण्यातील उच्चभ्रू अशा भांडारकर रोड परिसरात राहायला असून सेवानिवृत्त आहेत.
हेही वाचा - Nashik Municipal Corporation : मोठी बातमी! नाशकात भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अखेरच्या क्षणी युती...
हा सगळा प्रकार सायबर फसवणुकीचा असल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी अधिक तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे