नवी मुंबईतील वाशीमधील रहेजा रेसिडेन्सीमधील एक धक्कादयक प्रकार समोर आला आहे. वाशीमधील सेक्टर 14 एमजी कॉम्प्लेक्स ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रहेजा रेसिडेन्सीमधील 10,11,12 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या घटनेमुळे दहाव्या मजल्यावर घरात एका वृध्देचा मृत्यू झाला. तसेच 12 मजल्यावरील आई, वडील आणि 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - DRI Busts Chinese Firecracker: मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई! 4.82 कोटींचे चिनी फटाके जप्त
मध्यरात्री 12.40 च्या सुमारास रहेजा रेसिडेन्सीमध्ये दहाव्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली आणि 11व्या आणि 12 व्या मजल्याला आगीने कवेत घेतले. या आगीने भीषण स्वरुप धारण केल्याने वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
हेही वाचा - Women on Moving SUV Sunroof: मुंबईत सनरूफवर बसलेल्या दोन महिलांचा व्हिडिओ व्हायरल; रस्ते सुरक्षेवर गंभीर चिंता
मृतांमध्ये वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6), कमला हिरल जैन (वय 84), सुंदर बालकृष्णन (वय 44) आणि पुजा राजन (वय 39) यांचा समावेश आहे. तर अग्रवाल, जैन आणि घोष कुटुंबातील जखमी सदस्यांना हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कामोठेमध्येही भीषण आगीत मायलेकींचा मृत्यू
पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान कामोठे येथील सोसायटीतीत आग लागल्यानंतर नागरिक इमारतीमधून बाहेर पडेपर्यंत ही आग वेगानं पसरली. इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील घरातील तीन जण बाहेर पडले. मात्र, आई आणि मुलगी आतमध्येच अडकून पडल्या होत्या. या दोघींना वाचवण्यासाठी अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग विझवून आतमध्ये जाईपर्यंत या दोघींचा होरपळून मृत्यू झाला.