Tuesday, February 17, 2026 04:18:46 PM

Pandharpur : मकर संक्रांतीचा उत्साह, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दोन दिवस दर्शन वेळेत बदल, जाणून घ्या

पुरूषांसाठी विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

pandharpur  मकर संक्रांतीचा उत्साह  विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दोन दिवस दर्शन वेळेत बदल जाणून घ्या

नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे परंपरेनुसार मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यात येत आहे. संक्रांतीनिमित्त राज्यभरातून महिला भोगीसाठी मंदिरात दाखल होत असून महिला भाविकांना दर्शन घेण्यास प्रधान्य दिलं जाणार असून, पुरूषांसाठी विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

भाविकांच्या सोईच्या दृष्टीने दिनांक 13 जानेवारी रोजी श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे 4.30 ते 5.45 या वेळेत होऊन, पदस्पर्श दर्शन पहाटे 06.00 नंतर सुरू करणेत येणार आहे. 

हेही वाचा - New Railway Station : भव्य प्लॅटफॉर्म्स, सरकते जिने, लिफ्ट...; नवी मुंबईत नवे रेल्वे स्टेशन, प्रवाशांचा प्रवास अजूनच सुखकर

दिनांक 14 जानेवारी रोजी नेहमीच्या वेळेमध्ये मकरसंक्रांती निमित्त श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा झाल्यानंतर श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान केलेनंतर दर्शन सुरू करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - Gaimukh Ghat Traffic : ठाणेकरांचा वनवास संपणार; गायमुख घाट रुंदीकरणाला वेग... पण रुंदीकरणाच्या मार्गात उभा राहिला 'हा' नवा पेच

15 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा नेहमीच्या वेळेत करण्यात येणार असून, दिनांक 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांती निमित्त जास्तीत जास्त माता व भगिनींना श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरीता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री