Friday, March 13, 2026 07:46:53 AM

Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash : दादांचा मृत्यू झाला तो दिनक्रम महाराष्ट्राला कळणार? अमोल मिटकरींच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

काही तासांपूर्वी रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये गुप्तहेरांची भेट घेऊन माहिती घेणार असल्याचे समोर आले आहे.

amol mitkari on ajit pawar plane crash  दादांचा मृत्यू झाला तो दिनक्रम महाराष्ट्राला कळणार अमोल मिटकरींच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त केला जात आहे. या विषयाला अनेक कंगोरे असलेलेदेखील पाहायला मिळत आहेत. काही तासांपूर्वी रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये गुप्तहेरांची भेट घेऊन माहिती घेणार असल्याचे समोर आले आहे. 

अशातच आता नेहमी चर्चेत असणाऱ्या अमोल मिटकरी यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सर्वांचे पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण ! आता ब्लैक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व  "लवकरच" विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो".

हेही वाचा - UPI One World: आता परदेशी पर्यटकांना करणार येणार 'स्कॅन आणि पे'; NPCI कडून 'UPI One World' सेवा लाँच

पुढे त्यांनी लिहिले की, "आम्ही वाट पाहू पण तोवर विमानतळावरील CCTV फुटेज ,पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कुण्या गाडीत निघाले, कुण्या रोडवर ट्रॅफिक मध्ये अडकले , त्या ठिकाणचे cctv फुटेज व सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026 चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती".  त्यामुळे आता कोणती माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 


सम्बन्धित सामग्री