सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठंमोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. अशातच आज संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'ज्यांच्यामुळे आम्ही राजकारणात आहोत, त्यांच्याशिवाय एकही दिवस आमचा जात नाही. मात्र ज्यांनी चुका केलं त्याचा पश्चात्ताप करण्यापेक्षा आम्हाला दोष देतात. त्यांच्यामध्ये असलेली दुही ही उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहे. उद्धव ठाकरेंनी कधीही खंबीर भूमिका घेतली नाही".
2019 मधे युतीची सत्ता आली पाहिजे होती.मात्र यांनी भूमिका बदलली. यांच्याकडे कोणतेही पक्ष नसल्याने अवस्था झाली. भास्कर जाधव यांना वाटत असेल तरी संजय राऊत यांना शिल्लक राहिलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना संपवायची आहे.
भास्कर जाधव आणि संजय राऊतांवर साधला निशाणा
भास्कर जाधव हे मूळचे शिवसैनिक. त्यामुळे शिवसैनिक म्हणून त्यांना जाण आहे. मात्र संजय राऊत ला विचारले तर त्यांचा राजकीय गुरू कोण हे सांगता येत नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंना सिल्व्हर ओकवर फरपटत नेले होते असं म्हणायला काही हरकत नाही. भाजप कमजोर होती वाढत गेली, पाया मजबूत करत गेली. जो संजय राऊत बोलत आहे त्यांनी डोक तपासावं, धनुष्य बाण आम्ही वाचवले, झिम्मा फुगडी खेळायची वेळ आली होती. थोड विजय झाला तर झिम्मा फुगडी खेळली आणि आता आरोप करतात. टीकेला टीकेने नाही तर कामाने उत्तर हे जनतेने मान्य केले आहे.