नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नगरसेवकांना थेट घरी बसवत त्यांच्या जागी नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे फक्त आंदोलन आणि घोषणाबाजीपुरतं मर्यादित असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या तब्बल 11 तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नागपुरात भाजपने नगरसेवक पदासाठीची संधी दिली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसनही कार्यकर्ते आणि नव्या दमाच्या उमेदवारांना मैदानात उतरवत भाजपपुढे आव्हान उभं केलं आहे. नागपूर महापालिकेत 151 जागांसाठी निवडणूक होत आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप - काँग्रेस या मुख्य लढतीशिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, बसपा, असे अनेक पक्ष मैदानात आहे.
नागपूर
एकूण जागा - 151
सत्तास्थापनेसाठी जागा 76
भाजप - 143
शिवसेना (शिंदे) - 08
काँग्रेस - 151
राष्ट्रवादी काँग्रेस (AP)- 87
राष्ट्रवादी काँग्रेस (sp) - 70
मनसे- 23
शिवसेना (UBT)- 42" "भाजप - देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे
शिवसेना (शिंदे) - शिष जयस्वाल, कृपाल तुमाने, किरण पांडव
काँग्रेस - नितीन राऊत, प्रफुल गुडघे पाटील,श्यामकुमार बर्वे .रंजीत कांबळे,विलास मुत्तेवार
राष्ट्रवादी अजित पवार - प्रफुल पटेल, राजेंद्र जैन, प्रशांत पवार,श्रीकांत शिवणकर
राष्ट्रवादी शरद पवार - अनिल देशमुख, शेखर सावरबांधे, प्रकाश गजभिये
शिवसेना उद्धव - प्रमोद मानमोडे " "महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती.
भाजप - १०९
काँग्रेस - २९
बसपा - १०
शिवसेना - ०२
राष्ट्रवादी काँग्रेस - ०१"