राज्यामध्ये सध्या मुंबईसह २९ महापालिकांमध्ये निवडणुका लढवल्या जाणार आहेत. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 16जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्येही कलगीतुरा पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत 115 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
त्यामुळे संभाजीनगरमध्ये कोणाची सत्ता येणार? कोणाचं पारडं जड होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. संभाजीनगरमध्ये कोणत्या प्रभागातून कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आहेत? याबद्दल आता जाणून घेऊया.
महानगरपालिकेचे नाव - छत्रपती संभाजीनगर
एकूण जागा - 115
सत्तास्थापनेसाठी जागा- 57
पक्ष आणि लढत असलेल्या जागांचा आकडा -
युती- सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे
भाजप : 92 जागा लढवत आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) : 95 जागा लढवत आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे) :96 जागा लढवत आहे.
काँग्रेस : 71 जागा लढवत आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) : 75 जागा लढवत आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) : 23 जागा लढवत आहे.
एमआयएम : 47 जागा लढवत आहे.
वंचित : 61 जागा लढवत आहे.
भाजपा- मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, किशोर शितोळे
शिंदे शिवसेना-मंत्री संजय शिरसाठ, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल,
ठाकरे शिवसेना- अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे
काँग्रेस- खासदार डॉ कल्याण काळे
राष्ट्रवादी - अभिजीत देशमुख,
एम आय एम- इम्तियाज जलील
वंचित- अमित भुरगळ,
यांची प्रतिष्ठा पणाला आहे.
मागच्या महापालिकेत कुणाची सत्ता होती - पक्षनिहाय आकडेवारी
शिवसेना:- 28
भाजपा:- 23
एमआयएम:- 24
काँग्रेस:- 12
अपक्ष:- 18
बसपा:- 04
राष्ट्रवादी काँग्रेस:- 04
रिपाई (डे):- 02
एकूण :- 115