Tuesday, February 17, 2026 04:25:18 PM

Mahapalika Election 2026 : प्रचारासाठी कायपण! कार्यकर्त्यांनी चक्क केसात कोरले शिवधनुष्य, Photo Viral

हटके प्रचारासाठी मिरजेतील तरूणांनी लढवली खास शक्कल

mahapalika election 2026  प्रचारासाठी कायपण कार्यकर्त्यांनी चक्क केसात कोरले  शिवधनुष्य photo viral

महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत उमेदवार उभे  केले आहेत. याशिवाय राजकीय पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने काही अपक्षही आपले राजकीय भवितव्य अजमावत आहेत. 

हटके प्रचारासाठी मिरजेतील प्रभाग तीनमध्ये चार तरुणांनी डोकीवरील केस कापून उमेदवारांची निशाणी कोरुन लक्ष वेधून घेतले आहे. या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. जगदाळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रा. मोहन वनखंडे, माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे आदी उमेदवारासह सहभागी झाले होते.

हेही वाचा - K Annamalai: 'मी पुन्हा मुंबईत येऊन दाखवेन; तुमची हिम्मत असेल तर…' अन्नामलाई यांचे राज ठाकरेंच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर 

मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रचारात वेगळेपणा आणि उमेदवारांच्या  चिन्हाची चर्चा होण्यासाठी वेग-वेगळे प्रयोग राबविले जात आहेत. उमेदवारांच्या चिन्हाचा प्रचार  व चर्चा व्हावी यासाठी या प्रभागातील चार तरूणांनी केस कापून डोकीवर घड्याळ व धनुष्यबाण हे चिन्ह कोरले आहे.


सम्बन्धित सामग्री