शिवसेना नेते रविंद्र धंगेकर आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यामध्ये सध्या ट्विटरवॉर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्यांच्यामध्ये कार्टून कॅरेक्टरवरून वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. धंगेकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती तेव्हा टीका करण्याची धंगेकरांची लायकी नसल्याचे बन म्हणाले होते.
यावरुन नवनाथ बन यांनी धंगेकरांना सडेतोड उत्तर दिले आहे.धंगेकरांनी नवनाथ बन यांचा फोटो समाजमाध्यमावर शेअर करत 'हा डोरेमॉन कोण?' असा प्रश्न विचारला. या टीकेला उत्तर देताना बन यांनी ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिल दिलं आहे.
हेही वाचा - Shiv Sena Nirdhar Mela: एका खोलीत 38 मतदार कसे राहू शकतात? आदित्य ठाकरेंचा निर्धार मेळाव्यात निवडणूक आयोगाला सवाल
'जर मी डोरेमॉन असेन तर तुम्ही बावळट नोबिता आहात', असे थेट प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी धंगेकरांना दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "बारा पक्ष फिरून शिवसेनेते आलेले ज्येष्ठ नेते रविंद्रजी धंगेकर यांनी मला 'डोरेमॉन' म्हटलं आहे. पण ते विसरले की डोरेमॉन उपाय शोधतो. लोकांना मदत करतो. त्याच कार्टून सीरीजमध्ये 'नोबिता' नावाचं एक पात्र आहे.
हेही वाचा - Nagpur NCP Office Lavani Dance: नागपूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचा कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांकडून जोरदार टीका
तुमच्या म्हणण्यानुसार मी 'डोरेमॉन' आहे तर तुम्ही बावळट 'नोबिता' आहात. दरम्याने नवनाथ बन यांचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे.