सध्या संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जास्तच चर्चेत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळेदेखील एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. निवडणूकांसाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच शक्तीप्रदर्शन करण्यास सुरूवात केली आहे. काल मुंबईमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली. यामध्ये त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
राज ठाकरेंच्या या टीकेवरून शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी सवाल उपस्थित केलेत. ठाकरे बंधूंची ही सभा म्हणजे केवळ कौटुंबिक नाट्य असल्याचा घणाघात महाजनांनी केला. अदानींना घरी जेवायला का बोलावलं होतं, असा उलट सवाल देखील त्यांनी केला.