Wednesday, November 19, 2025 01:24:35 PM

Uddhav Thackeray Satyacha Morcha : पुन्हा ॲनाकोंडाचा उल्लेख, ठाकरेंनी अमित शाहांसह फडणवीसांनाही घेरलं

राज ठाकरे यांनी दुबार मतदार असल्याचे सांगितले तसेच मतचोरी झाली असल्याचा गंभीर आरोप सरकारवर केला आहे. तसेच उध्दव ठाकरे यांनीदेखील विरोधकांवर निशाणा साधला आहे.

uddhav thackeray satyacha morcha  पुन्हा ॲनाकोंडाचा उल्लेख ठाकरेंनी अमित शाहांसह फडणवीसांनाही घेरलं

मुंबईमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्या 'सत्याचा मोर्चा'ची चर्चा सर्वत्र सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये मतदार यादीमधील असलेला घोटाळा नेमका काय आहे? याबद्दल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही याबद्दल मत मांडणार असून यामध्ये मतदार यादीतील घोटाळ्याबद्दल माहिती दिली. राज ठाकरे यांनी दुबार मतदार असल्याचे सांगितले तसेच मतचोरी झाली असल्याचा गंभीर आरोप सरकारवर केला आहे. तसेच मतदार नोंदणी हि खोटी असल्याचा आरोपदेखील केला आहे. 

राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मतदार नोंदणी प्रकरणावर बोलण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी विरोधाकांवर टीका करण्यास सुरुवात केली. "माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रानंतर राज्यातील राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदा झाली असेल. मतचोरी करणाऱ्यांना सांगतो आज ठिणगी बघत आहात. या ठिणगीची आग कधी होईल सांगता येत नाही. तुमच्या बुडाला आग लागेल. शोलेत एक डायलॉग आहे. दूर गाव में बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आयेगा. तसं सांगतो, सावध राहा. नाही तर ॲनाकोंडा येईल” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

नंतर ते म्हणाले कि, "राजने सगळा घोळ उघडकीस आणला आहे. तरीही निवडणूक आयोग ऐकत नाही. निवडणूक आयोग यांचा नोकर आहे. मी अॅनाकोंडा का म्हणतोय. यांची भूक थांबत नाही.  "पक्ष आणि नाव चोरलं. आता मतचोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे कि नाही हे तपासा. उद्धव ठाकरे या नावानेदेखील बोगस  मतदार नोंदणी झाली आहे. पण मी अर्ज केला आहे याबद्दलच मला कल्पना नव्हती". 


सम्बन्धित सामग्री