Sunday, February 15, 2026 07:50:55 AM

PCMC Election Results 2026 : दादा की भाऊ? पिंपरी चिंचवडमध्ये कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या

pcmc election results 2026  दादा की भाऊ पिंपरी चिंचवडमध्ये कोणाची सत्ता येणार जाणून घ्या

15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया झाली तर आज 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आज आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांचा अनेकांना फटका बसताना दिसतोय. 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली होती. मात्र, यंदा पूर्णपणे समीकरणे बदलली आहेत.

राष्ट्रवादीच्या कदम निकिता, वाघेरे उषा, आसवाणी हिरानंद उर्फ डब्बू किमतराम, भाजपचे वाघेरे संदीप बाळकृष्ण 2017 च्या निवडणुकीत विजयी झाले होते. मिलिंदनगर, संजय गांधीनगर, पिंपरी गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीपर्यंत प्रभाग आहे. प्रभाग 21 वर भाजपाकडून दावा केला जात आहे.

प्रभाग 24 वर भगव्याचं वर्चस्व की कमळाचं वर्चस्व यावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत आदी भाग प्रभाग 24 मध्ये येतात. 24 मधील एकूण मतदार संख्या 38 हजार 779 एवढी आहे. 

प्रभाग क्रमांक 23 मधील एकूण लोकसंख्या 36 हजार 947 एवढी आहे. तर या प्रभागातील अनुसूचित जातींची संख्या 2,182 आणि अनुसूचित जमातींची संख्या 330 एवढी आहे. प्रभाग 23 मध्ये भाजपाचे वर्चस्व बघायला मिळाले.


सम्बन्धित सामग्री