नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीसह मित्रपक्षांचा धुव्वा उडवत स्वबळावर एकहाती सत्ता मिळवली आहे. मात्र संजय राऊत हे विरोधकांवर सतत निशाणा साधत आहेत. अशातच आता संजय राऊत यांनी आपल्या एक्स अंकाउटवरुन मंत्री गिरीश महाजन व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट करुन खळबळ उडवून दिली आहे.
राऊतांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?
(आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार) असं शिर्षक देऊन संजय राऊत यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन व राहुल ढिकले यांच्यातील संभाषणावरुन लिहलं आहे की, राहुल ढिकले : साने निवडून आला म्हणजे अवघड आहे. तुमची कृपा.
गिरीश महाजन : मुसलमानांना मुळे झाला *चिपड्या* बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना काय महंतो/ अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो
आमदार बाई भेटू देत नवती
पुढे काय होणार?
आता मंत्री महाजन किंवा आमदार राहुल ढिकले यांच्याकडून या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.