uddhav thackeray on ramdas kadam
दसरा मेळाव्याला शिंदे शिवसेना गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावरून वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यावरून मोठ्या प्रमाणात गोंधळदेखील निर्माण झाला आहे. अशातच आता कदमांच्या आरोपामुळे उद्धवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत आणि उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
"मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमक हराम आहे. उत्तर देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहित आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही" तसेच "ज्यांनी माझा पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडील चोरले त्यांचं कसलं मेरिट आहे. हा अन्याय आहे. निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव अचलून दुसऱ्यांना देण्याचा अधिकार नाही."
हेही वाचा - Chandrakant Patil On Gautami Patil : 'गुन्हा दाखल करा...', गौतमी पाटील कार अपघातप्रकरणात चंद्रकात पाटीलांची उडी
त्याचप्रमाणे "माझा पक्ष हा शिवसेनाच आहे, शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहिल. मी निवडणूक आयोगाचं, आयुक्ताचं नाव हे धोंड्या ठेवलं होतं. आता तो धोंड्या गेल्या तो कुठे गेला हे माहीत नाही. तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही. कारण माझ्या पक्षाचं नाव हे आजोबांनी आणि वडिलांनी ठेवलं आहे. निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नव्हते" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.