Saturday, December 06, 2025 11:41:19 AM

Ajit Pawar: अजित पवारांचा चौकशीला पाठिंबा; म्हणाले "नोंदणी अधिकाऱ्यांनी हे व्यवहार मंजूर कसे काय केले?"

या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, “हा व्यवहार मुळात होताच कामा नये होता.

 ajit pawar अजित पवारांचा चौकशीला पाठिंबा  म्हणाले quotनोंदणी अधिकाऱ्यांनी हे व्यवहार मंजूर कसे काय केलेquot

पुणे: कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन खरेदी व्यवहारामुळे राज्यात मोठा वाद सुरू झाला आहे. हा व्यवहार अमेडिया कंपनीमार्फत करण्यात आला असून, या कंपनीचे संचालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील आहेत. या प्रकरणात शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवहारादरम्यान आवश्यक असलेले स्टॅम्प ड्युटी शुल्क न भरल्याने शासनाला आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, “हा व्यवहार मुळात होताच कामा नये होता. आम्ही जेव्हा कागदपत्रं पाहिली, तेव्हा पहिला प्रश्न मनात आला की नोंदणी अधिकारी यांनी हे व्यवहार मंजूर कसे केले? हे आमच्याही आकलनापलीकडचे आहे.” ते पुढे म्हणाले, “हा मुद्दा माझ्या लक्षात येताच मी स्पष्ट सांगितले की या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हायलाच हवी. कोणाचंही नाव असलं तरी फरक पडत नाही.

हेही वाचा: Muzaffarnagar Scooter Fine: बापरे! स्कूटर चालकाला ठोठावण्यात आला 20.74 लाख रुपयांचा दंड; चालान पाहून सोशल मीडियावर उडाली खळबळ

गेल्या 35 वर्षांच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर अनेक आरोप झाले, पण कधीही कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र, या आरोपांमुळे मला नेहमीच बदनामीचा सामना करावा लागला.” अजित पवार म्हणाले, “सहसा अशा प्रकारचे आरोप निवडणुका जवळ आल्यावर समोर येतात आणि निवडणुका संपल्यानंतर आपोआप गायब होतात. तरीही, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की नियमांनुसार संपूर्ण चौकशी करावी.”

त्यांनी सांगितले, “या प्रकरणात राज्य सरकारमधील एका तहसीलदारासह तीन जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून छापे आणि तपासणी सुरू आहेत.” ते पुढे म्हणाले, “मी स्वतः या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतो आहे. या व्यवहारात कोणाचाही गैरव्यवहार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. शासनाने चौकशी प्रक्रिया सुरू केली असून ती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होईल.” या प्रकरणामुळे पुण्यातील जमीन व्यवहारांबाबत प्रशासनाची भूमिका आणि नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवार यांनी चौकशीला पूर्ण पाठिंबा देत स्पष्ट केले की, “सत्य समोर आलेच पाहिजे.”

हेही वाचा: US Soldiers Missing: अमेरिकेचे 40 हजार सैनिक गायब! समुद्रात शोधकार्य सुरू; नेमकं प्रकरण काय?

 

सम्बन्धित सामग्री