विजय चिडे; प्रतिनिधी. जालना: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आता रणभुमीत उतरायचं शेवटची आरपार अंतिम लढाई लढुन जिंकयाची आहे. दोन वर्षांपासून सतत लढतोय त्यामुळे आता 29 ऑगस्ट मुंबईत आंदोलन करणार असुन ओबीसीतुन आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसुन मुंबई आंदोलनाला जाण्यासाठी 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतुन कुच करणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या राज्य व्यापी बैठकीत बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन वर्षांचा वेळ दिला. पण, आता आमच्यातील संयम संपला आहे. आता ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असल्याचा निर्धार केला असुन आता वाशी बिशी नाही, सरळ मुंबईत जायचे असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईत शांततेत आंदोलन होणार असून फडणवीसांचे आम्ही शत्रू नाही. पण मुंबईकडे जातान, एकाही मराठ्याला काठी लागली तर मुंबईतीलसह राज्यभरातील पाणंद रस्ते सुद्धा मोकळे राहणार नसल्याचा इशाराही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. पुढे म्हटले की, मैदान आपल्याला गाजवायचे असून गुलाल पण आपल्याच अंगावर घ्यायचा आहे. दोन वर्षांपासून मराठा आंदोलनासाठी लढत आहे. ही अंतिम लढाई मराठ्यांनी पार करायची असल्याचे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा: लोणीकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मालेगावात महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन
58 लाख नोंदी निघून चार कोटी मराठा आरक्षणात गेले आहे, मुंबईत आंदोलन करण्यासाठी मराठा समाजाने गावागावातुन तयारी करायाची मुंबईत गुलाल उधळला शिवाय माघार नसल्याचं सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणी आम्हाला आडमुठे समजु नये आजी माजी आमदार खासदार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन वर्षांत पहिल्यांदा भेटीसाठी अंतरवाली सराटीत बोलविले असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.आमच्या आरक्षण प्रश्न सोडविला तर आम्ही मुंबईत आंदोलन करणार नाही उलट गुलाल उधळला जाणार असल्याचे सांगितले.मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढा.
हेही वाचा: कामाच्या बहाण्याने नाशिकला नेऊन अल्पवयीन मुलीची विक्री
हैद्राबाद सातारा,बॉम्बे गॅझेटीयर लागू करा,मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घ्या, मराठा आंदोलनात बळी गेलेल्याचा कुटुंबातील सदस्याला नोकरी आणि आर्थीक मदत करा शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या आमच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आहेत.त्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. 27 ऑगस्टला अंतरवालीतून सकाळी 10 वाजता निघणार,28 ला आझाद मैदानावर पोहचणार 29 ला आंदोलन सुरू करणार, मुंबईत करणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. रुठ - अंतरवाली सराटीतुन प्रस्तान शहागड , पैठण फाटा , पैठण, शेवगाव , अहील्यानगर चौक, पांढरी पुल ,आळाफाटा,शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन, पुढे वाशी,चेंबूर,मंत्रालय आझाद मैदान येथे पोहचणार आणि आंदोलन सुरू करणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.