Wednesday, June 18, 2025 01:41:00 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ! सोल्डरिंग उपकरणाने दिले चटके

पीडितेच्या पतीसह कुटुंबातील पाच सदस्यांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. फुलंब्री परिसरातील रहिवासी असलेल्या या महिलेने तिच्या पोलिस तक्रारीत आरोप केला आहे की, तिचे सासरचे लोक तिचा छळ करत होते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ सोल्डरिंग उपकरणाने दिले चटके
Dowry Case In Chhatrapati Sambhajinagar
Edited Image

छत्रपती संभाजीनगर: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेल्या तिच्या सारच्या मंडळींनी 25 लाख रुपये हुंड्यासाठी चक्क सोल्डरिंग उपकरणाने डागल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पीडितेच्या पतीसह कुटुंबातील पाच सदस्यांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. फुलंब्री परिसरातील रहिवासी असलेल्या या महिलेने तिच्या पोलिस तक्रारीत आरोप केला आहे की, तिचे सासरचे लोक तिचा छळ करत होते. तसेच तिच्या पालकांकडून 25 लाख रुपये मिळवण्याची मागणी करत होते.

फुलंब्री पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेचे हात आणि पाय बांधून तिला सोल्डरिंग मशीनने जाळण्यात आले. पोलिसांनी सोमवारी तिचा पती, सासू, नंणद आणि इतर कुटुंबातील सदस्यांसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस सध्या पीडित महिलेच्या सासरच्यांची चौकशी करत आहेत. चौका गावातील रहिवासी असलेल्या या महिलेचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. पीडितेला पाच वर्षांचा मुलगा आहे. 

हेही वाचा - लातुरात 20 लाखांसाठी अर्पिताचा हुंडाबळी

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी क्रूरता, चुकीच्या पद्धतीने कोंडून ठेवणे आणि स्वेच्छेने दुखापत करणे या कलमांखाली पीडितेच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पुष्टी केली आहे. महिला बऱ्याच काळापासून त्रास सहन करत होती. परंतु, तिने यापूर्वी तक्रार केली नव्हती. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन पथके स्थापन केली असून सहा जणांना अटक केली असल्याचं राठोड यांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा - हिंजवडीतल्या हुंडाबळीचा महिला आयोगावर गंभीर आरोप

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण - 

काही दिवसांपूर्वी हुंड्यासाठी छळ केल्याने पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली होती. यानंतर आज वैष्णवी हगवणेच्या सासऱ्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तथापि, या प्रकरणातील आणखी एक आरोपी नीलेश चव्हाण, ज्याने वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकी दिल्याचा आरोप आहे, त्याला 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 
 


सम्बन्धित सामग्री